Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
'शाळेत तो शिपाई आहे; पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे', या मामूसंबंधी केलेल्या विधानाचा अर्थ पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
शाळेत एक शिपाई म्हणून मामू नोकरी करत होता. तो कष्टमय जीवन जगणारा एक कर्मचारी होता. अशा माणसाचे आयुष्य सामान्य पातळीवरच राहते. पण मामूचे मात्र तसे नव्हते. अनेकांना अनेक बाबतीत तो तत्परतेने मदत करायला जाई. यामुळे त्याला अनेक गोष्टींचे आपोआपच ज्ञान होत गेले.
लोकांना मदत करावी, ही त्याची वृत्तीच होती. कोणाच्या दुकानावर जाऊन बस, ती चालवायला मदत कर, कोणाच्या मुलांना उर्दू शिकवायला जा. आयुर्वेदिक औषधोपचार करण्यात तर त्यांचा हातखंडा होता. कोणाला काही दुखले-खुपले तर तो आवर्जून औषधोपचार करी. लोकांना 'आत्मीयतेने आरोग्यविषयक सल्ला देई. अशी समोर येतील ती कामे मामू करीत गेला. मनापासून करीत गेला. आपल्याला हे येणारच या आत्मविश्वासाने करीत गेला. त्यातून अनेक कौशल्ये वाढत गेली. तो हरहुन्नरी बनला. जणू तो बहुरूपीच होता. तो नीतीने वागणारा होता. त्याला लोकांविषयी कळकळ वाटत असे. कोणालाही तो तत्परतेने मदत करी. या सगळ्या गुणांमुळे समाजात त्याला खूप मान होता. आमदार, खासदार, बड़े व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक अशा वरच्या थरांतल्या लोकांशी त्याचे आपुलकीचे नाते निर्माण झाले होते. त्या लोकांमध्ये त्याला मानाचे स्थान होते. अगदी सामान्यांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत तो सर्वत्र सामावून गेला होता म्हणून लेखकांनी त्याला बहुरूपी म्हटले आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कोण ते लिहा.
चैतन्याचे छोटे कोंब:
कोण ते लिहा.
सफेद दाढीतील केसाएवढ्या आठवणी असणारा:
कोण ते लिहा.
अनघड, कोवळे कंठ :
कृती करा.
लेखकाने विदयार्थ्यांचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्द समूह :
कृती करा.
मामुची शाळाबाह्य रूपे :
खालील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा.
मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. ___________
खालील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा.
मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, ‘‘घाबरू नकोस. ताठ बस. काय झालं न्हाई तुला.’’ - ___________
खालील वाक्यातील तुम्हाला समजलेले मामूचे गुण लिहा.
माझ्याकडं कुणी बडा पाहुणा आला, की मामूकडं बघत नुसती मान डुलवली, की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो. - ______
खालील वाक्यातील तुम्हाला समजलेले मामूचे गुण लिहा.
मामू एखादया कार्यक्रमात मुलांच्यासमोर दहा-वीस मिनिटे एखादया विषयावर बोलू शकतो. - ____________
खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
थोराड घंटा
खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
अभिमानाची झालर
स्वमत.
मामूच्या संवेदनशीलतेची दोन उदाहरणे तुमच्या शब्दांत लिहा.
स्वमत.
मामूच्या व्यक्तित्वाचे (राहणीमान, रूप) चित्रण तुमच्या शब्दांत करा.
अभिव्यक्ती
'मामू' या पाठाची भाषिक वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
अभिव्यक्ती
मामूच्या स्वभावातील विविध पैलूंचे विश्लेषण करा.
अभिव्यक्ती
'माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे', या विधानातील आशयसौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.
