Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
साधू कोणाकोणाला कशी कशी मदत करतात, ते कवितेच्या आधारे स्पष्ट करा.
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
दुःख व पीडा भोगत असलेल्या लोकांची सेवा करणे, हा साधूचा धर्म असतो, असा सुविचार संत तुकाराम महाराज यांनी या अभंगातून मांडला आहे. लोणी जसे आतून बाहेरून मऊ मुलायम असते, तसे साधूचे मन कोमल व संवेदनशील असते. ज्या लोकांना आधार नसतो, अशा माणसांना जो मायेने कुशीत घेतो, तो खरा साधू होय. आपल्या मुलांवर जसे प्रेम असते, तसेच प्रेम जो दास व दासी यांच्यावर करतो; आपले मूल व दास-दासी यांत प्रेमाच्या बाबतीत फरक करीत नाही; सर्वांना समान प्रेमभाव देतो, तो खरा सज्जन असतो.
shaalaa.com
संतवाणी - (आ) जें कां रंजलें गांजलें
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
