मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

सुबक व नामनिर्देशित आकृती काढून त्याविषयी स्पष्टीकरण लिहा. नेचे

Advertisements
Advertisements

प्रश्न

सुबक व नामनिर्देशित आकृती काढून त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.

नेचे

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर


               नेचे

  1. नेचे अबीजपत्री वनस्पतींमध्ये सर्वांत मोठा प्रगत वर्ग असून या वर्गातील वनस्पती पृथ्वीवर सर्वत्र आढळून येतात.
  2. या वनस्पती थंड, ओलसर व सावली असलेल्या जागी मोठया प्रमाणावर आढळून येतात.
  3. या वनस्पतींची मुळे तंतूमय असून ती जमिनीखालील खोडापासून वाढतात.
  4. कंदासारख्या खोडावर (Rhizome) सुस्पष्ट अशी पाने दिसून येतात.
  5. या वनस्पतींमध्ये पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी सुस्पष्ट अशी संवहनी संस्था असते.
  6. या वनस्पतीत, पर्णिकेच्या मागील पृष्ठभागात स्थित बीजाणूधानी पुंजांमध्ये बीजाणूंची निर्मिती होते आणि त्यांद्वारे अलैंगिक प्रजनन संपन्न होतो.
  7. या वनस्पतींमध्ये फुलांची, तसेच बियांची निर्मिती होत नाही.
  8. काही नेच्यांचा उपयोग अन्नात, औषधात तसेच सुशोभिकरणासाठी केला जातो.
shaalaa.com
उपसृष्टी - अबीजपत्री वनस्पती > टेरिडोफायटा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: वनस्पतींचे वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ८०]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 6 वनस्पतींचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 4. 3 | पृष्ठ ८०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×