मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

एकदा दीपाली सोनालीबरोबर खेळत बसली होती. तेवढ्यात एक पेशन्ट तिथे आला. त्याला ते दृश्य पाहून धक्काच बसला. दीपाली चुकून सिंहिणीकडे गेली असावी, या कल्पनेने तो धावला आणि त्याने दीपालीला चटकन उचलून घेतले. एक परका माणूस प्रिय व्यक्तीला उचलून घेतो याचा सोनालीला संताप आला. ती त्याच्यावर फिसकारली आणि चवताळून त्याच्यावर धावली. तिचा तो अवतार पाहून त्याने दीपालीला तशीच टाकली. तेवढ्यात अण्णा बाहेर आले. त्यांना घडलेली हकिकत समजली. तो प्रसंग प्रत्यक्ष पाहण्यासाठी अण्णांनी त्या गृहस्थाला दीपालीला उचलायला सांगितले. त्या गृहस्थाने दीपालीला हात लावला, मात्र सोनाली चवताळून त्याच्या अंगावर धावली. लेखकांचे घर हे आता तिला स्वतःचे घर वाटत होते. घरातली माणसे ही आता तिची माणसे झाली होती. परक्या माणसांनी घरातल्या माणसांना हातसुद्धा लावणे तिला मंजूर नव्हते. सोनालीच्या मनातली प्रेमाची ही उत्कट भावना या प्रसंगातून व्यक्त होते.

shaalaa.com
सोनाली
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 17: सोनाली - कृती [पृष्ठ ७२]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati Standard 10 Maharashtra State Board
पाठ 17 सोनाली
कृती | Q (७) (अ) | पृष्ठ ७२

संबंधित प्रश्‍न

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


खालील वाक्यातून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा.

सोनालीचे दात कधी रूपालीला लागले नाहीत - ______ 


खालील वाक्यातून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा.

रूपाली सोबत नसली तर सोनाली जाळीच्या दारावर पंजे मारी - ______


खालील वाक्यातून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा.

सोनालीने एक मोठ्ठी डरकाळी फोडली - ______ 


खालील वाक्यातून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा.

सोनाली शांत होऊन लेखकाचे पाय चाटू लागली - ______ 


खालील वाक्यातून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा.

मोठ्ठ्याने फिस्कारून सोनाली गृहस्थाच्या अंगावर आली - ______ 


खालील वाक्यातून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा.

सोनाली आळीपाळीने आमच्याकडे पाहत होती - ______ 


पुढील घटना केव्हा घडल्या ते लिहा.

घटना घटना केव्हा घडली
(अ) सोनाली अण्णांवर रागावली. ______
(आ) सोनालीने पातेल्याची चाळणी केली. ______
(इ) सोनाली गृहस्थाच्या अंगावर धावली. ______
(ई) सोनाली बिथरली, गरागरा फिरू लागली. ______

सोनाली आणि रूपाली यांच्यातील मैत्री दर्शवणाऱ्या त्यांच्या दोन सवयी लिहा.

____________

____________


‘पशूंना कोणी फसवलं, तर त्यांना राग येतो’, यासंबंधी तुम्ही अनुभवलेली एखादी घटना तुमच्या शब्दांत सांगा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

1. कृती पूर्ण करा:  (2)

           झोपायची वेळ झाली, की सोनाली उडी मारून बिछान्यात शिरे; पण चटकन झोपी जायचा तिचा स्वभावच नव्हता. बिछान्यात आली, की ती माझं तोंड चाटू लागे, मग केस चाटे. पंजानं माझे केस विस्कटून टाकी. कधी ती अन् रूपाली यांची दंगामस्ती माझ्याच बिछान्यात चालायची. दोघीही बिछान्यात चक्क नाचत, कुदत, थकल्या-दमल्या, की दोघीही आपापली जागा पकडून झोपायला येत. फुस्स करून रूपा अंग टाकी आणि झोपी जाई; पण सोनालीला मात्र अशी झोप येत नसे. लहान मुलासारखं तिला मला थोपटून झोपवावं लागे. तेव्हा कुठे बाईसाहेब झोपत. ती झोपे तीही एखाद्या लहान मुलासारखी अस्ताव्यस्त. झोपेत बाईसाहेब लोळतही भरपूर. शेवटी त्या दोघींच्या मध्ये मलाच झोपायला पुरेशी जागा मिळत नसे. 

           सोनाली आणि रूपाली लहान होत्या तोपर्यंत रूपालीच अंगापिंडानं मोठी होती. वयानं तर ती सोनालीपेक्षा चांगली सात दिवसांनी मोठी. त्यामुळे ती सोनालीवर ताईगिरी करी. सोनालीवर गुरगुरे, तिला दमात घेई. सोनाली बिचारी गरीब. रूपाली तिच्यावर गुरगुरली, की बापडी कोपऱ्यात जाऊन निमूट बसे. पण दोघी वाढू लागल्या आणि सारं दृश्यच बदललं.

2. कोण ते लिहा:  (2)

  1. सोनालीवर ताईगिरी करणारी - ______
  2. झोपायची वेळ झाली की उडी मारून बिछान्यात शिरणारी - ______

3. स्वमतः  (3)

सोनाली व रूपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×