Advertisements
Advertisements
प्रश्न
संक्षिप्त टीप लिहा.
‘कामागाटा मारू’
टीपा लिहा
Advertisements
उत्तर
- महायुद्धाच्या काळात भारतातील कित्येक लोक देशांतर करू लागले. कॅनडा, अमेरिकेला जाऊ लागले.
- कॅनडाचे सरकार हे ब्रिटिश सरकारच्या हातातले बाहुले होते. त्यांनी हिंदी लोकांना थारा देण्याचे नाकारले. बाबा गुरूदितसिंग यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या कामगाटा मारू जहाजाला कॅनडाने आपल्या बंदरात व्हँकुव्हर नांगर टाकू दिला नाही. हे परागंदा झालेलेहिंदी लोक परत भारतात आले.
- ‘कामागाटा मारू’ हे जहाज कोलकाताच्या जवळच्या ‘बजबज’ या बंदरात पोहचले.
- जहाजातील उतारूंनी ताबडतोब आपापल्या गावी जावे असे त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितले. लोकांनी तो हुकूम मोडला. इंग्रज अधिकाऱ्यांनी गोळीबार केला. त्यात ३० लोक ठार झाले. इंग्रजांच्या या निर्दयीपणामुळे देशात प्रचंड प्रक्षोभ माजला.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
