मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

समुद्र किंवा नदीच्या तेलाचे तवंग कसे नष्ट केले जातात? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

समुद्र किंवा नदीच्या तेलाचे तवंग कसे नष्ट केले जातात?

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. पेट्रोलिअम म्हणजेच क्रूड तेलाची गळती निरनिराळ्या कारणांनी समुद्रात होत असते.
  2. हे तेल जलचरांसाठी घातक व विषारी ठरू शकते.
  3. पाण्यावर आलेला तेलाचा तवंग यांत्रिक पद्धतीने दूर करता येतो. पण हे कठीण असते.
  4. त्यामुळे जैविक पद्धतीने या तेल तवंगाला दूर करण्यासाठी अल्कॅनिव्होरॅक्स बॉरक्युमेन्सिस व स्युडोमोनास हे जीवाणू वापरले जातात.
  5. या जीवाणूमध्ये पिरिडिन्स व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट होतात.
  6. हे जीवाणू हायड्रोकार्बनोक्‍लास्टिक बॅक्टेरिया (HCB) असतात.
  7. HCB हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग घडवून आणतात. या अभिक्रियेत CO2 व पाणी तयार होते. अशा रितीने समुद्र किंवा नदीमध्ये सांडलेल्या तेलाचे तवंग नष्ट केले जातात.
shaalaa.com
स्‍वच्‍छ तंत्रज्ञान (Clean Technology)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची - स्वाध्याय [पृष्ठ ८६]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
स्वाध्याय | Q 3. आ. | पृष्ठ ८६

संबंधित प्रश्‍न

आम्ल पर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपिक कशी केली जाते?


ॲसिडीफिलीयम प्रजाती या जीवाणूंसाठी सल्‍फ्युरिक आम्ल हा ऊर्जास्रोत आहे.


मानवनिर्मित रसायनांचा नाश करण्याची क्षमता सूक्ष्मजीवात नैसर्गिकरित्याच आढळते.


युरेनिअम अविद्राव्य क्षारांत रूपांतर करणारे सूक्ष्मजीव कोणते?


शास्त्रीय कारणे लिहा.

समुद्रातील तेलगळतीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो.


दिलेल्या उताऱ्यातील गाळलेल्या जागा योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.

[ऑक्सिजन, पिरिडिन्स, यांत्रिक, CO2, पेट्रोलिअम, घातक, पॉलिस्टर, नॉर्काडीया]

समुद्रात विविध कारणांनी ______ तेलाची गळती होते. हे तेल जलचरांसाठी ______, विषारी ठरू शकते. पाण्‍यावर आलेला तेलाचा तवंग ______ पद्धतीने दूर करणे सोपे नाही. पण अल्‍कॅनिव्‍होरॅक्‍स बॉरक्‍युमेन्सिस व स्‍युडोमोनास जीवाणूंमध्‍ये ______ व इतर रसायने नष्‍ट करण्‍याची क्षमता आहे. त्‍यामुळे तेलाचे तवंग नष्‍ट करायला या जीवाणूंच्‍या समूहाचा वापर केला जातो. त्‍यांना H.C.B म्‍हणतात. H.C.B हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्‍यातील कार्बनचा ______ संयोग घडवून आणतात. या अभिक्रियेत ______ व पाणी तयार होते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×