मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

श्रीमती देसाई यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स, बाजारभाव 50 रुपये असताना विकले तेव्हा त्यांना 4988.20 रुपये मिळाले. दलालीचा दर 0.2% व दलालीवरील जीएसटीचा दर 18% आहे, - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

श्रीमती देसाई यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स, बाजारभाव 50 रुपये असताना विकले तेव्हा त्यांना 4988.20 रुपये मिळाले. दलालीचा दर 0.2% व दलालीवरील जीएसटीचा दर 18% आहे, तर त्यांनी किती शेअर्स विकले ते काढा.

बेरीज
Advertisements

उत्तर

येथे, शेअरची दर्शनी किंमत ₹ 100,

बाजारभाव ₹ 50,

शेअर्सची विक्री किंमत ₹ 4,988.20,

दलाली दर = 0.2 %, जीएसटीचा दर = 18 %

दलाली = बाजारभावाच्या 0.2 %

`= 0.2/100 xx 50` = ₹ 0.1

जीएसटी = दलालीच्या 18 %

`= 18/100 xx 0.1` = ₹ 0.018

एका शेअरची विक्री किंमत

= बाजारभाव – (दलाली + जीएसटी)

= 50 - (0.1 + 0.018)

= 50 - 0.118

= ₹ 49.882

∴ शेअरची संख्या = `"सर्व शेअर्सची विक्री किंमत"/"एका शेअरची विक्री किंमत"`

`= 4988.20/49.882` = 100

∴ श्रीमती देसाई ह्यांनी 100 शेअर्स विकले.

shaalaa.com
दलालीवर वस्तू व सेवा कर
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: अर्थनियोजन - सरावसंच 4.4 [पृष्ठ १०९]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 4 अर्थनियोजन
सरावसंच 4.4 | Q 4 | पृष्ठ १०९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×