मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

शन्नूच्या वागण्यामागील तिचा विचार काय असावा, याविषयी तुमचे मत लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शन्नूच्या वागण्यामागील तिचा विचार काय असावा, याविषयी तुमचे मत लिहा.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

अब्दुलची बायको शन्नू ही एक सर्वसामान्य गृहिणी आहे. इतरांप्रमाणेच आपल्या पतीनेही चांगला धंदा करावा, खूप पैसे कमवावेत, म्हणजे घर व्यवस्थित चालेल असा तिचा विचार आहे. शिवाय, ऐन सणांदिवशी, ज्यावेळी कितीतरी बायका दुकानात बांगड्या भरायला येतात त्यावेळी अब्दुल आपले दुकान बंद ठेवून तपोवनातील स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जातो, हे तिला पटत नाही कारण, त्यामुळे चांगले पैसे कमावण्याची संधी अब्दुल गमावून बसतो. परिणामी, पुरेसे पैसे मिळत नाहीत आणि आपल्या मुलाचा साधा हट्टही पुरवता येत नाही, जमा-खर्च बसवताना ओढाताण होते, असे तिला वाटत असावे. या सर्वांचा परिणाम म्हणून अब्दुलला शन्नूची बोलणी ऐकावी लागतात; पण तिच्या अशा वागण्यामागे कर्तव्यदक्ष गृहिणी म्हणून ‘आपल्या कुटुंबाचा विचार’ महत्त्वाचा आहे, असे दिसते.

shaalaa.com
चुडीवाला
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: चुडीवाला - कृती [पृष्ठ २२]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 6 चुडीवाला
कृती | Q (७)(आ) | पृष्ठ २२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×