Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय व्यवस्थापनाची कोणतीही पाच तत्व स्पष्ट करा.
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
- विज्ञान आहे, मुलभूत नियम नाही: संघटनात्मक कार्यक्षमता वाढविण्यासाठी ‘रूल ऑफ थम्ब’ ची पद्धत न वापरता कामाच्या वैज्ञानिक विश्लेषणाद्वारे विकसित केलेल्या पद्धतींचा वापर केला पाहिजे. सर्वसाधारण पद्धतीने घेतलेले निर्णय व्यवस्थापकाच्या वैयक्तिक आकलनावर आधारित असतात. टेलर यांनी प्रत्येक लहान कामासाठीही वैज्ञानिक पद्धतींच्या वापराचा आग्रह धरला. व्यवस्थापनाचे हे तत्त्व प्रत्येक कामाचे वैज्ञानिक विश्लेषण करून ते काम करण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत शोधून काढणे याला महत्त्व देते.
- समरसता आहे, विवाद नाही: या तत्त्वानुसार कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यात सामंजस्य असले पाहिजे. या दोन्हीमधील समन्वय त्यांच्यातील संघर्ष कमी करण्यास मदत करेल. कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यातील सामंजस्यामुळे कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण निर्माण करणे तसेच अपेक्षित ध्येय प्राप्ती म्हणजेच यश मिळविणे शक्य होते. संघटनेनेही कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा व विकासाचा विचार केला पाहिजे.
- मानसिक क्रांती: टेलर यांनी मानसिक क्रांतीची' संकल्पना मांडली. हे तत्व कर्मचारी व व्यवस्थापन या दोन्हींचा एकमेकांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणण्यावर भर देते. कर्मचारी व व्यवस्थापक या दोघांनाही संघटनेतील त्यांच्या समान अस्तित्वाची जाणीव असली पाहिजे. संघटनेचे ध्येय प्राप्त करण्यासाठी दोघांनीही पूर्ण सहकार्याने काम केले पाहिजे. यामुळे उत्पादन क्षमता व नफा दोन्हीमध्ये वाढ होते.
- सहकार्य आहे. व्यक्तिगत स्वार्थ नाही: हे तत्त्व कार्यबल म्हणजेच कर्मचारी व व्यवस्थापनातील परस्पर सहकार्याला महत्त्व देते. सहकार्य, विश्वास, संघभावना इत्यादीमुळे अंतर्गत स्पर्धेचे रूपांतर सुदृढ संघटनात्मक वातावरणात होते. निर्णय प्रक्रियेमध्ये व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचा नेहमीच विचार केला पाहिजे.
- जबाबदारीचे विभाजन: व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये नेहमी कामाच्या योग्य विभाजनासह जबाबदाऱ्यांचेही योग्य विभाजन केले जावे. उच्च व मध्यम स्तरावरील व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून कामाचे नियोजन केले जाते तर कर्मचारी त्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करतात. आपल्या वारिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसार कर्मचारी आपले काम पार पाडतात. व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांना सतत मदत, प्रोत्साहन व मार्गदर्शनही केले पाहिजे. यामुळे व्यवस्थापक व कर्मचारी दोघांचीही कामगिरी उत्कृष्ट होण्यास मदत होते.
- अधिक कार्यक्षमता व समृद्धीसाठी मालक आणि कर्मचाऱ्यांचा विकास: कोणत्याही संघटनेची उत्कृष्ट कामगिरी फार मोठ्या प्रमाणात त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या कौशल्यांवर आणि क्षमतांवर अवलंबून असते. म्हणूनच गरजेनुसार कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण व विकास कार्यक्रम राबविण अत्यावश्यक असते. अंतिमत: या सर्वांचा परिणाम संस्थेच्या नफ्यावर होतो. प्रत्येक कर्मचाऱ्याला उच्च प्रतीची कार्यक्षमता व कमाल समृद्धीची योग्य संधी दिली पाहिजे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Question Paper
