Advertisements
Advertisements
प्रश्न
‘शाल व शालीनता’ या पाठाच्या आधारे तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
शालीनता हा व्यक्तीच्या स्वभावाचा एक गुण आहे, जो नैसर्गिक असावा लागतो, तर शाल हे सन्मानाचे प्रतीक मानले जाते. एखाद्या व्यक्तीचा गौरव करण्यासाठी तिला श्रीफळ व शाल दिले जाते. मात्र, सन्मान म्हणून मिळालेली शाल आणि व्यक्तीची शालीनता यांचा थेट संबंध असतोच असे नाही. कवी नारायण सुर्वेही याच गोष्टीवर प्रकाश टाकतात. प्रत्येक शाल मिळालेली व्यक्ती शालीन असेलच किंवा ज्या व्यक्तीला शाल मिळाली नाही ती शालीन नसेल, असे गृहीत धरता येत नाही. केवळ शाल पांघरल्याने मनातील व आचरणातील शालीनता प्राप्त होत नाही. तसेच, स्वभावतः शालीन असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शालस्वरूपी सन्मान मिळेलच असेही नाही; परंतु ती व्यक्ती आपल्या शालीनतेचे जतन करत राहते. त्यामुळे, ‘शाल’ आणि ‘शालीनता’ यांचा थेट परस्परसंबंध आहेच असे म्हणता येत नाही.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पु. ल. व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख - ______
उत्तरे लिहा.
२००४ च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष - ______
उत्तरे लिहा.
सभासंमेलने गाजवणारे कवी - ______
शालीचे शाल या पाठात आलेले विविध उपयोग लिहा.

खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा.
एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते.
कारणे शोधून लिहा.
एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा जास्त होती, कारण ..............
कारणे शोधून लिहा.
शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही, कारण ___
कारणे शोधून लिहा.
लेखकांच्या मते शालीमुळे शालीनता जाते, कारण ______
आकृती पूर्ण करा.

खालील वाक्यांतील कृतींतून किंवा विचारांतून कळणारे लेखकाचे गुण शोधा.
बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या.
खालील वाक्यांतील कृतींतून किंवा विचारांतून कळणारे लेखकाचे गुण शोधा.
खरे तर, खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते!
खालील वाक्यांतील कृतींतून किंवा विचारांतून कळणारे लेखकाचे गुण शोधा.
हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या.
‘भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग’, याविषयी तुमचे मत लिहा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)
१. म्हातारा भिक्षेकरी कोठे बसला होता?
२. भिक्षेकर्याने अंगावर व अंगाखाली काय पांघरले होते?
|
पुढे चार-पाच दिवस मला काही कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वराला जाण्यास उसंत लाभली नाही. त्यांनतर मी नेहमीप्रमाणे ये-जा करत राहिलो. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. पाहतो तो काय, तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दीनवाणे जिणे! मी म्हटले, ’बाबा, तुम्ही मला ओळखले?“ त्याने नकारार्थी मान हलवली. मग मीच म्हटले, ’बाबा, पाच-सहा दिवसांपूर्वी मी तुम्हांला दोन शाली दिल्या होत्या. आठवते?“ यावर म्हातारा खुलला व पुन्हा हात जोडून म्हणाला, ’हे भल्या माणसा, तू लई मोठा! म्यास्नी शाली दिल्या! पण बाबा, म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट! मी शाली इकल्या व दोन-तीन दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा! आमचं हे असलं बिकट जिणं! तुझं लई उपकार हायेत बाबा.“ शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब! भुकेल्यास अन्न दयावे, तहानलेल्यास पाणी दयावे आणि हेही जमले नाही, तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी दयाव्यात! |
२. आकृतिबंध पूर्ण करा. (०२)

३. स्वमत कृती (०३)
'पांघरण्यासाठी दिलेल्या शाली भिक्षेकऱ्याने विकल्या' त्याची ही कृती तुम्हांस योग्य वाटते, की अयोग्य हे सकारण लिहा.
