Advertisements
Advertisements
प्रश्न
सहसंबंध स्पष्ट करा.
राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता.
खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा.
राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
- राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता एकमेकांशी विसंगत नाहीत.
- भारतासारख्या खंडप्राय आणि विविधतेने नटलेल्या देशात प्रादेशिक अस्मितेचा आदर करूनच राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येईल.
- राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठी भारताने संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केला.
- प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी राज्यांची भाषावर पुनर्रचना करण्यात आली.
- राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात २२ भाषांचा समावेश करण्यात आला. राज्यांना यांपैकी कोणत्याही भाषेत राज्यकारभार करण्याची मुभा देण्यात आली आहे.
shaalaa.com
राज्याची भूमिका
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने - स्वाध्याय [पृष्ठ ४७]

