Advertisements
Advertisements
प्रश्न
पुरवठ्याचे कोणतेही चार निर्धारक घटक स्पष्ट करा.
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
पुरवठा म्हणजे एखाद्या विशिष्ट कालावधीत, ठराविक किमतीला, एखादा विक्रेता विक्रीसाठी देऊ करण्यास इच्छुक आणि समर्थ असलेली वस्तूची मात्रा होय.
पुरवठ्याचे निर्धारक घटक पुढीलप्रमाणे आहेत:
- वस्तूची किंमत: किंमत हा वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. जास्त किमतीला अधिक पुरवठा केला जातो व कमी किमतीला कमी पुरवठा केला जातो. अशा प्रकारे किंमत व पुरवठा यांचा सम संबंध असतो.
- तंत्रज्ञानाची स्थिती: उत्पादन तंत्रातील सुधारणांमुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढते व पुरवठाही वाढतो.
- उत्पादन खर्च: उत्पादन घटकांच्या किमती वाढल्या तर उत्पादन खर्च वाढतो. परिणामी पुरवठा कमी होतो.
- पायाभूत सुविधा: वीज, वाहतूक, दळणवळण इत्यादी पायाभूत सुविधांचा परिणाम उत्पादन प्रक्रिया व पुरवठ्यावर होतो. या सुविधांच्या अभावामुळे पुरवठा कमी होतो आणि सुविधांची अधिक उपलब्धता असल्यास पुरवठा जास्त केला जातो.
- सरकारची धोरणे: अनुकूल शासकीय धोरणामुळे पुरवठा वाढतो आणि प्रतिकूल शासकीय धोरणामुळे पुरवठा कमी होतो. सरकारचे करविषयक, अर्थसाहाय्य, औद्योगिक धोरणे इत्यादी धोरणामुळे उत्पादन आणि पुरवठा कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे सरकारच्या धोरणावर पुरवठा अवलंबून आहे.
- नैसर्गिक परिस्थिती: कृषी उत्पादनांचा पुरवठा नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतो. उदा., चांगला पाऊस आणि योग्य हवामान असल्यास चांगले उत्पादन होते. त्यामुळे कृषी उत्पादन वाढून पुरवठा वाढतो. याउलट प्रतिकूल हवामानामुळे पुरवठा कमी होतो.
- भविष्यकालीन किंमतीचा अंदाज: नजीकच्या भविष्यात किंमती वाढण्याची शक्यता असल्यास उत्पादक साठा वाढवेल. त्यामुळे पुरवठा कमी होईल आणि याउलट किंमती कमी होण्याची शक्यता असल्यास उत्पादक साठा कमी करून पुरवठा वाढवेल.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
