मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पूर्ण स्पर्धेची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पूर्ण स्पर्धेची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:

  1. असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक: पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक असतात. अगोदर उल्ख ले केल्याप्रमाण एकूण बाजारात प्रत्येक विक्रेता व ग्राहक यांचा सहभाग नगण्य असतो. त्यामुळ कोणताही एक विक्रेता बाजारातील किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही. अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेत विक्रेते किंमत स्वीकारणार असतात.
    तसेच ग्राहकांचीही संख्या प्रचंड असते. प्रत्येक ग्राहकाची खरेदी ही एकूण खरेदीचा अल्पसा भाग असतो. त्यामुळे वस्तूच्या किमतीवर कोणताही ग्राहक प्रभाव पाडू शकत नाही.
  2. एकजिनसी वस्तू: पूर्ण स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे असंख्य विक्रेत्यांकडून विकली जाणारी वस्तू ही ग्राहकाच्या दृष्टीने आकार, रूप, रंग, चव इ. बाबतीत एकजिनसी असली पाहिजे. सर्व वस्तू परस्परांना पूर्णत: पर्यायी असतात.
  3. मुक्त प्रवेश आणि निर्गमन: या बाजारपेठेत प्रवेश आणि निर्गमनावर कुठलेही निर्बंध नसतात. जर नफ्याची आशा असेल तर उद्योगसंस्था बाजारात प्रवेश करतात आणि तोट्याची शक्यता असेल तर बाजारातून निर्गमन करतात.
  4. एकच किंमत: पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एकच किंमत असते, जी मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेने निर्धारित होते.
  5. बाजाराचे संपूर्ण ज्ञान: ग्राहक आणि विक्रेते यांना बाजार स्थितीचे संपूर्ण ज्ञान असते. प्रत्येक ग्राहक आणि विक्रेता यांना वस्तूची किंमत, गुणवत्ता, दर्जा, पुरवठ्याचा स्रोत इ. चे ज्ञान असते.
  6. उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता: पूर्ण स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य असे की उत्पादनाचे घटक हे पूर्णत: गतिशील असतात. म्हणजेच श्रम, भांडवल यांसारखे घटक भौगोलिकदृष्ट्याच नव्हे, तर व्यावसायिकदृष्ट्याही गतिशील असतात.
  7. वाहतूक खर्चाचा अभाव: पूर्ण स्पर्धेत वस्तूंची किंमत सर्वत्र सारखी असते. कारण वाहतूक खर्च गृहीत धरलेला नसतो. या गृहीतकामुळे किंमत समानता निर्माण होते.
  8. सरकारी हस्तक्षेप नाही: निर्हस्तक्षेप धोरण हे पूर्ण स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ आर्थिक घडामोडीमध्ये शासकीय हस्तक्षेपाचा पूर्णत: अभाव असतो.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×