Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विषयावर संक्षिप्त टिप लिहा:
ग्रामीण भूमी उपयोजन.
टीपा लिहा
Advertisements
उत्तर
ग्रामीण भागातील भूमी उपयोजनावर नैसर्गिक परिस्थितीचा मोठा पगडा असतो. प्रामुख्याने, ग्रामीण जमिनीचा वापर मोठ्या प्रमाणावर शेती आणि त्याच्याशी संबंधित कामांसाठीच केला जातो. भूमी अभिलेख कार्यालयाने भूमी उपयोजनाचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले आहे:
- वन- वनाखालील क्षेत्र
- बिगरशेती- वस्ती (ग्रामीण/नागरी), पायाभूत सोयी (रस्ते, कालवे इ.) उद्योग, दुकाने इत्यादींचा समावेश बिगरशेतीमध्ये होतो.
- ओसाड (नापीक) व अनुत्पादक प्रदेश- उंचसखल डोंगराळ भूमी, ओसाड वाळवंट व घळीयुक्त भूमी यांचा समावेश होतो.
- कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन- ग्रामपंचायतीची किंवा शासनाची जमीन व फारच रथोडी जमीन खासगी मालकीची असू शकते.
- किरकोळ वृक्ष, पिके व वनराई, जमीन (निव्वळ लागवडीखाली नसलेली)- फळबागा वफळझाडांखालील क्षेत्राचा यात समावेश होतो. बहुतेक जमीन खासगी मालकीची असते.
- पिकाऊ अनुत्पादक जमीन- पाच वर्षांपेक्षा अधिक काळ पडीक (पडीत) असलेली जमीन यात असते.
- चालू पडजमीन- एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ लागवडीखाली नसलेली जमीन या क्षेत्रात येते.
- चालू पडशिवायची पड जमीन- ही लागवडीयोग्य जमीन असते पण एका वर्षांपेक्षा जास्त व पाच वर्षांपेक्षा कमी काळ जेव्हा जमीन पडीक राहते तेव्हा ती या क्षेत्रात येते.
- निव्वळ लागवडीखालील क्षेत्र- प्रत्यक्ष लागवड केलेले व ज्यातून उत्पादन घेतलेले आहे असे शेतीखालील क्षेत्र या क्षेत्रात येते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
