Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सत्य की असत्य आहे ते कारण देऊन सांगा:
जागतिकीकरणाचा भारतीय समाजावर प्रभाव पडलेला आहे.
चूक किंवा बरोबर
Advertisements
उत्तर
हे विधान सत्य आहे.
कारण:
- डॉ. मनमोहनसिंग भारताचे अर्थमंत्री असताना त्यांनी अंमलात आणलेल्या नवीन आर्थिक धोरणांमुळे, १९९१ मध्ये भारतातील जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला चालना मिळाली.
- त्यांच्या धोरणांना LPG असे म्हटले गेलेः ‘एल’ म्हणजे लिबरलायझेशन म्हणजेच ‘उदारीकरण’. ‘पी’ म्हणजे प्रायव्हेटायझेशन म्हणजेच ‘खासगीकरण’ आणि ‘जी’ म्हणजे ग्लोबलायझेशन म्हणजेच ‘जागतिकीकरण’ या तीन नवीन धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला जणू मोकळे आकाशच मिळाले.
- भारत हा जिथे खुला व्यापार, परकीय भांडवल आणि स्रोत आकृष्ट करण्यासाठी खुले वातावरण, आणि उद्योग सुरु करण्याची सुलभता या सोयी उपलब्ध आहेत, अशा अर्थव्यवस्थेच्या व्यापक जागतिक व्यापारी विश्वाचा भाग झाला. सुरुवातीला या नव्या आर्थिक धोरणाचा उपहास केला गेला, त्यावर टीका झाली.
- जागतिकीकरणाचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम आहेत.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
