मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा: ऑगस्ट महिन्यात श्रावण असतो आणि श्रावण म्हणजे 'राखी पौर्णिमा!' सगळ्यांचा आवडता सण. ऑगस्ट महिन्यात येणारा मराठी महिना व सण - - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

ऑगस्ट महिन्यात श्रावण असतो आणि श्रावण म्हणजे 'राखी पौर्णिमा!' सगळ्यांचा आवडता सण. त्या राखीच्या एका धाग्यानं बहीण-भावाचं नातं कायमचं घट्ट राहतं. बहिणीच्या भावावरील निरपेक्ष प्रेमाची आणि भावावरील तिच्या रक्षणाच्या जबाबदारीची ही भावनिक वीण. मग आपल्या रक्षणकर्त्याला प्रत्यक्ष भेटून राखी बांधली, आशीर्वाद दिले; तर आपली कृतज्ञता व्यक्‍त होईल आणि राखीचा सन्मान होईल. आमचं एकमत झालं आणि रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून लोकांना घेऊन कारगिलला जायचं हे निश्‍चित ठरवलं. चोवीसजण आमच्याबरोबर यायला तयार झाले आणि सरू झालं 'मिशन लडाख'.

सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं, सैनिकांना भेटायचं; म्हणजे जणू सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवायचा होता. बर्‍याच खटपटी करून आम्हांला निघण्यापूर्वी १४ कोअरच्या लेहमधील हेडक्वार्टरमधून प्रतिसाद आला. आम्हांला १४ कोअरच्या कर्नल झा यांनी बोलावलं होतं. आमचं मन धास्तावलं, सैन्यदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बोलायचं होतं; पण मनातील कित्येक प्रश्‍नांची भेंडोळी कर्नल झा यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वापुढे बाद झाली.

“तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात.'' अशी पाठीवर थाप मिळाली आणि निघताना दारापर्यंत सोडायला आल्यावर कर्नल झा हात हातात घेऊन म्हणाले, “विसरू नका - वन्स कनेक्टेड, ऑलवेज कनेक्टेड.'' त्यांचा शब्द त्यांनी पुढील वर्षी आणि थेट दहा वर्षांनीही पाळला अरुणाचलमध्ये भारत-चीन सीमेवर भेटून!

  1. (आकलन)    (२)
    ऑगस्ट महिन्यात येणारा मराठी महिना व सण -
    (य) -----------------
    (र) -----------------
  2. (आकलन)    (२)
    लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांना कर्नल झा दहा वर्षांत दोनदा भेटले ती ठिकाणे -
    (य) -----------------
    (र) -----------------
  3. (स्वमत/अभिव्यक्ती)    (४)
    “तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात.'' या वाक्याची यथार्थता स्पष्ट करा.
    किंवा
    “बहीण-भावाचं अतूट नातं राखी पौर्णिमेच्या सणानिमित्त दृढ होतं,” हे तुमच्या शब्दांत लिहा.
आकलन
Advertisements

उत्तर

  1. (य) श्रावण
    (र) राखी पौर्णिमा
  2. (य) लेह-लडाख
    (र) अरुणाचल
  3. भारतीय लष्करातील सैनिक हे खऱ्या अर्थाने देशाचे रक्षक आहेत. ते आपल्या कुटुंबापासून हजारो मैल दूर राहतात आणि अहोरात्र देशाच्या सुरक्षेसाठी तत्पर असतात. कठीण भौगोलिक परिस्थितीत, दऱ्या-खोऱ्यांतून, वाळवंटातून फिरत, कडाक्याच्या थंडीत बर्फाच्छादित प्रदेशात सतत जागरूक राहून ते कर्तव्य बजावतात. त्यांचे जीवन अत्यंत कठीण आणि कष्टमय असते.

    लेखिकेने सहकाऱ्यांसह या वीर सैनिकांना प्रत्यक्ष भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सैनिकांशी आपुलकीने संवाद साधला आणि प्रेमाने राखी बांधली. सामान्य नागरिक आणि सैनिक यांच्यातील ही भेट कर्नल झा यांना अतिशय महत्त्वाची वाटली. या भेटीमुळे सैनिकांचे मनोबल उंचावेल आणि ते अधिक आत्मीयतेने देशसेवा करतील, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळेच त्यांनी उत्स्फूर्तपणे उद्गार काढले – "तुम्ही लष्कराचे मनोबल खूप वाढवत आहात."

    किंवा

    बहीण-भावाचे नाते हे अतूट आणि दृढ असते. लहानपणापासूनच ते एकमेकांशी भावनिकदृष्ट्या जोडलेले असतात. त्यांना परस्परांचा स्वभाव व गरजा समजतात, आणि दोघांमध्ये प्रेम व मायेचे नाते असते. ‘राखी पौर्णिमा’ किंवा ‘रक्षाबंधन’ या सणामुळे हे नाते आणखी दृढ होते.

    दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला प्रेमाने ओवाळते, तर श्रावण महिन्यातील पौर्णिमेला राखी बांधून त्याच्याकडे आपल्या रक्षणाची जबाबदारी सोपवते. भाऊ देखील बहिणीच्या रक्षणासाठी नेहमी कटिबद्ध राहतो. बहिणीच्या भावावर असलेल्या निःस्वार्थ प्रेमामुळे आणि तिच्या रक्षणाची जबाबदारी भावाने स्वीकारल्यामुळे त्यांच्यात एक भावनिक बंध निर्माण होतो. म्हणूनच राखी पौर्णिमेच्या सणानिमित्ताने बहीण-भावाचे नाते अधिक दृढ होते, असे लेखिकेने "वीरांना सलामी" या पाठात स्पष्ट केले आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2022-2023 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×