Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:
अधिकार साखळीचे तत्त्व
Advertisements
उत्तर
या तत्त्वानुसार विशिष्ट अधिकारी साखळीद्वारेच आदेश, सूचना, निरोप, स्पष्टीकरण इत्यादी बाबींचे संज्ञापन व्हायला हवे. यालाच अधिकार साखळीचे तत्त्व म्हणतात. प्रत्येक माहितीचे संज्ञापन हे साखळीतील विशिष्ट दुव्याद्वारेच व कोणताही दुवा न टाळता केले गेले पाहिजे. अधिकार साखळी खूप वेळखाऊ आहे. आणीबाणीच्या काळात किंवा गुप्त माहितीचे जलद हस्तांतरण करावयाचे असल्यास त्यासाठी छोटा मार्ग सुचवला आहे, याला गँग प्लँक म्हणजेच जोडफळी म्हणतात. यामध्ये समान स्तरावरील दुवे टाळून संज्ञापन केले जाते. अधिकार साखळीचे तत्त्व पुढील आकृतीच्या साहाय्याने अधिक स्पष्ट होईल:

वरील पहिल्या आकृतीनुसार ‘ड’ आणि ‘ग’ यांच्याबरोबर ‘क’, ‘ब’, ‘अ’, ‘ई’ आणि ‘फ’ यांच्या संवादाला ‘अधिकार साखळी’ म्हणतात आणि दुसऱ्या आकृतीनुसार ‘ड’ व ‘ग’ यांच्यामधील संदेशवहनाला (संवादाला) ‘गँग प्लँक (जोडफळी)’ म्हणतात; कारण ‘ड’ व ‘ग’ यांच्यामध्ये कोणाचीही मदत न घेता थेट संवाद होत आहे.
