Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:
कविता: 'हिरवंगार झाडासारखं'
| मुद्दे | हिरवंगार झाडासारखं |
| (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
| (ii) प्रस्तुत कवितेचा विषय - | |
| (iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा - | पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं. |
| (iv) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश | |
| (v) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे - |
तक्ता पूर्ण करा
Advertisements
उत्तर
| मुद्दे | हिरवंगार झाडासारखं |
| (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | जॉर्ज लोपीस |
| (ii) प्रस्तुत कवितेचा विषय - | माणसाने आपले आयुष्य झाडासारखे जगावे, हे सूत्र या कवितेतून मांडले आहे. |
| (iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा - | कवी झाडाच्या अंतरंगाची भावना व्यक्त करतो. तो सांगतो की झाडावर अनेक पक्षी येतात, थोडा वेळ थांबून विश्रांती घेतात आणि निघून जातात. या पक्ष्यांचे झाडांशी कुठलेही मैत्रीचे नाते नसते. तरीही झाड त्यांचेच असते आणि त्यांना आधार देते. |
| (iv) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश | कवी जॉर्ज लोपीस यांनी लिहिलेल्या या मुक्तछंद कवितेचे उल्लेख आहे. या कवितेत झाडाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. झाडाच्या सहनशीलतेचे, दुसऱ्यांसाठी जगण्याच्या वृत्तीचे, आणि कठीण प्रसंगीही ठाम उभे राहण्याच्या जिद्दीचे कौतुक केले आहे. |
| (v) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे - | कवीचा संदेश स्पष्ट होतो. माणसाने झाडांप्रमाणेच प्रसन्न, हिरवेगार आणि सहनशील असावे, अशी शिकवण ही कविता देते. झाडाच्या गुणांमधूनच मानवी आयुष्याला प्रेरणा घेण्याचे आवाहन कवी करतो. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
