Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दांच्या आधारे कृती सोडवा:
| मुद्दे | अंकिला मी दास तुझा |
| (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
| (2) प्रस्तुत कवितेचा विषय | |
| (3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. |
सवेंचि झेंपावें पक्षिणी पिलीं पडतांचि धरणीं |
| (4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
| (5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. | (i) काज - |
| (ii) धेनू - | |
| (iii) कनवाळू - | |
| (iv) मेघ - |
तक्ता पूर्ण करा
Advertisements
उत्तर
| मुद्दे | अंकिला मी दास तुझा |
| (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | संत नामदेव |
| (2) प्रस्तुत कवितेचा विषय | देवाला आई मानून, देवरूपी मातेने बाळाचा म्हणजेच आपला सांभाळ मायेने करावा, अशी विनवणी करणारा हा अभंग आहे. |
| (3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. | झाडावरून अचानक जर पिल्लू खाली पडले, तर लगेच पक्षिणी त्याच्याकडे झेप घेते. पिल्लाला वाचवण्यासाठी ती पटकन जमिनीवर येते. |
| (4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण |
या अभंगात संत नामदेव यांनी श्रीविठ्ठलाला आई संबोधून स्वतःचा सांभाळ करण्याची विनवणी केली आहे. हा अभंग वाचताना मला सतत माझ्या आईची आठवण झाली. आई किती जपते आपल्याला! देवानेही आईप्रमाणे आपल्यावर नित्य माया करावी, हा विचारच मनाला भावला. म्हणूनच मला हा अभंग खूप आवडला. |
| (5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. | (i) काज - काम |
| (ii) धेनू - गाय | |
| (iii) कनवाळू - दयाळू | |
| (iv) मेघ - ढग |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
