मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

पाठात शोधून लिहा. महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दांत केले आहे? - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पाठात शोधून लिहा.

महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दांत केले आहे?

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

ताराबाईंच्या कर्तृत्वाचे वर्णन करताना 'शिवभारत'कार परमानंदाचा मुलगा कवी देवदत्त याने म्हटले आहे,

ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।
दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।
रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली।
प्रयत्नाची वेळ आली। मुगल हो सांभाळा॥

"राजारामांची पत्नी ताराबाई भद्रकालीप्रमाणे कोपायमान झाली. त्यामुळे दिल्लीच्या पातशाहाची-औरंगजेबाची अवस्था दीनवाणी झाली, त्याचे तेज हरपले. भद्रकालीप्रमाणे पराक्रमी असणारी राजारामांची राणी ताराबाई मुघलांशी युद्ध करायला सज्ज होऊन तिने रणरागिणीचे रूप धारण केले; म्हणून मुघलांनो, आता स्वतःला सांभाळा!"

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12: मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम - स्वाध्याय [पृष्ठ १३९]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 12 मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम
स्वाध्याय | Q २. (४) | पृष्ठ १३९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×