मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

नालकुंतल म्हणजे काय? त्याच्या चुंबकीय क्षेत्राची तुलना चुंबकपट्टीच्या चुंबकीय क्षेत्राशी करून आकृत्या काढा व भागांना नावे द्या. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

नालकुंतल म्हणजे काय? त्याच्या चुंबकीय क्षेत्राची तुलना चुंबकपट्टीच्या चुंबकीय क्षेत्राशी करून आकृत्या काढा व भागांना नावे द्या.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

विद्युतरोधक आवरण असलेली तांब्याची तार घेऊन कुंडलांची मालिका तयार केल्यास त्या रचनेस नालकुंतल (Solenoid) म्हणतात.
नालकुंतलातून विद्युतधारा वाहत असताना निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्रातील बलरेषा पट्टीचुंबकाच्या चुंबकीय बलरेषांप्रमाणेच असतात. नालकुंतलाचे एक टोक दक्षिण ध्रुव म्हणून, तर दुसरे टोक उत्तर ध्रुव म्हणून कार्य करते. नालकुंतलाच्या आतील भागातील चुंबकीय क्षेत्र एकसमान असते.

नालकुंतलातून विद्युतधारा गेल्यामुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राच्या चुंबकीय बलरेषा

B: बॅटरी, K : प्लगकळ, I : विद्युतधारा,
N: उत्तर ध्रुव, S : दक्षिण ध्रुव

 

पट्टीचुंबकाभोवती असणाऱ्या चुंबकीय बलरेषा

shaalaa.com
नालकुंतलातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र (Magnetic field due to a current in a solenoid)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: विद्युतधारेचे परिणाम - स्वाध्याय [पृष्ठ ६१]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 4 विद्युतधारेचे परिणाम
स्वाध्याय | Q ९. | पृष्ठ ६१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×