मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली का आढळते? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली का आढळते?

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  • मानवी वस्तीकरता जमिनीचा उतार व सुपीकता, अनुकूल हवामान, पाण्याची उपलब्धता खनिजसाठा, वाहतुकीच्या सोई इत्यादी बाबी महत्त्वपूर्ण असतात. अशा प्रकारची स्थिती जेथे उपलब्ध होते तेथे मानवी वस्त्यांची वाढ होते.
  1. उदा. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, पूर्व किनारपट्टी, नर्मदेचे खोरे, विंध्य पठार आणि भारतातील शेतीखालील इतर भाग या ठिकाणी मानवी वस्ती केंद्रित स्वरूपाची आहे.
  2. तर, ब्राझीलमध्येही किनारपट्टीजवळील सावो पावलो हा कॉफीच्या उत्पादनासाठी सुयोग्य प्रदेश आहे. शिवाय, सागर सान्निध्य, मुबलक खनिजसाठा, वाहतुकीच्या सोई यांमुळे येथे मानवी वस्ती केंद्रित झालेली आहे.
  • याउलट, जेथे मानवी वस्तीस फारशी अनुकूल स्थिती नाही, त्या ठिकाणी विखुरलेली मानवी वस्ती आढळते.
  1. उदा. भारतात हिमालयाच्या उतारावरील प्रदेश, विखंडित व उंचसखल प्रदेश, मध्य भारताचा वनाच्छादित प्रदेश, राजस्थानचा पश्चिम व दक्षिण भाग इत्यादी ठिकाणी मानवी वस्ती विखुरलेली आहे.
  2. तसेच, ब्राझीलमध्ये ईशान्य भागातील अवर्षणग्रस्त उच्चभूमीच्या प्रदेशात मर्यादित शेती आणि ॲमेझॉन खोऱ्यात घनदाट विषुववृत्तीय वने, रोगट हवामान व वाहतुकीच्या मर्यादित सोई यांमुळे याठिकाणी विखुरित वस्त्या आढळतात. याला अपवाद निग्रो व ॲमेझॉन नद्यांच्या संगमावरील मॅनॉस बंदर.
    अशारीतीने, एकूण देशांचा विचार करता हवामान जमिनीचा उतार व सुपीकता, पाण्याची उपलब्धता, वाहतुकीच्या सोई यांमध्ये भिन्नता असल्याने मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानी झालेली आढळते.
shaalaa.com
मानवी वस्ती
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: मानवी वस्ती - स्वाध्याय [पृष्ठ ५१]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 7 मानवी वस्ती
स्वाध्याय | Q ३. (इ) | पृष्ठ ५१
एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
पाठ 7 मानवी वस्ती
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. | Q 3
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×