मराठी

खालील विषयावर पत्र लिहा. (लिफाफा आवश्यक) समर्थ पुणतांबेकर व श्वेता नेवासकर मॉडर्न विद्यालय, शिवाजीनगर, पुणे

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विषयावर पत्र लिहा. (लिफाफा आवश्यक)

समर्थ पुणतांबेकर व श्वेता नेवासकर मॉडर्न विद्यालय, शिवाजीनगर, पुणे हे शालेय प्रतिनिधी आपल्या शाळेसाठी क्रीडासाहित्याच्या दुकानातून, शिंदे स्पोर्ट्स, टिळक रस्ता, पुणे या दुकानमालकास क्रीडासाहित्य मागविणारे पत्र लिहितात.

लेखन कौशल्य
Advertisements

उत्तर

प्रति,
मा. व्यवस्थापक,
शिंदे स्पोर्ट्स,
टिळक रस्ता, पुणे.
दिनांक: 20 फेब्रुवारी, 2026

विषय: शालेय क्रीडासाहित्याची मागणी करण्याबाबत.

महोदय,

सप्रेम नमस्कार.

     मी समर्थ पुणतांबेकर, मॉडर्न विद्यालय, शिवाजीनगर, पुणे या शाळेचा ‘शालेय प्रतिनिधी’ या नात्याने आपणास हे पत्र लिहित आहे. आमच्या शाळेत लवकरच वार्षिक क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने शाळेला काही नवीन क्रीडासाहित्याची आवश्यकता आहे. आपल्या दुकानातील साहित्याचा दर्जा उत्तम असतो, असे आम्हाला समजले आहे. तरी कृपया खालील तक्त्यात दिलेल्या साहित्याचा पुरवठा आमच्या शाळेच्या पत्त्यावर लवकरात लवकर करावा:

अ. क्र. साहित्याचे नाव नग कंपनी/विवरण
1. क्रिकेट बॅट 05 इंग्लिश विलो
2. लेदर बॉल 10 कोस्को (लाल)
3. बॅडमिंटन रॅकेट्स 08 योनेक्स
4. फुटबॉल 04 निविया
5. कॅरम बोर्ड 02 मोठ्या आकाराचे

वरील साहित्यावर शालेय सवलत देऊन एकूण बिलाची रक्कम पत्राद्वारे कळवावी. साहित्याची मिळाल्यानंतर आम्ही त्वरित धनादेशाद्वारे पैसे अदा करू. कृपया सर्व साहित्य दर्जेदार असावे, ही नम्र विनंती.

आपला नम्र,
समर्थ पुणतांबेकर
(शालेय प्रतिनिधी)
मॉडर्न विद्यालय, शिवाजीनगर, पुणे.
ईमेल: [email protected]

प्रति,
मा. व्यवस्थापक,
शिंदे स्पोर्ट्स,
टिळक रस्ता,
पुणे - 411002
प्रेषक,
समर्थ पुणतांबेकर
मॉडर्न विद्यालय,
शिवाजीनगर, पुणे.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×