मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील विधान सकारण स्पष्ट करा: ग्राहकांवर अनेक जबाबदार्‍या आहेत. - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधान सकारण स्पष्ट करा:

ग्राहकांवर अनेक जबाबदार्‍या आहेत. 

कारण सांगा
औचित्य
Advertisements

उत्तर १

  1. अधिकारांचा वापर करणे: ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकांस अनेक अधिकार दिले आहेत. ग्राहकाने या अधिकारांबाबत जागरूक राहून वस्तू/सेवांची खरेदी करताना त्यांच्या अधिकारांचा वापर केला पाहिजे. सावध राहणे - ग्राहकाने वस्तू/सेवांची खरेदी करताना त्यांच्या जबाबदाऱ्या समजून घेतल्या पाहिजेत. खरेदी करताना ग्राहकाने वस्तू/सेवेची गुणवत्ता (दर्जा), प्रमाण, किंमत, उपयुक्तता इ. संबंधी चौकशी केली पाहिजे.
  2. तक्रार दाखल करणे: जर वस्तू/सेवेसंबंधीच्या काही तक्रारी असतील तर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे ही ग्राहकाची जबाबदारी आहे. जर तक्रार दाखल करण्यास विलंब झाला तर उत्पादनाच्या हमीचा कालावधी पूर्ण होऊ शकतो. काहीवेळा ग्राहकाने व्यावसायिकाच्या अप्रमाणिक कृतीकडे दुर्लक्ष केल्यास व्यवसायाकडून अनैतिक व्यापारी प्रथांचा अवलंब करण्याचे धाडस वाढते.
  3. दर्जासंबंधीची जागरूकता: ग्राहकाने वस्तूच्या दर्जाशी केंव्हाही तडजोड करू नये. तसेच ग्राहकाने कमी किंमतीच्या लोभासाठी निकृष्ट दर्जाचा माल खरेदी करू नये. जर ग्राहकाने निकृष्ट दर्जाच्या मालावर विश्वास ठेवला तर कोणत्याही क्षेत्राकडून ग्राहकांचे संरक्षण करणे शक्‍य नसते. म्हणून दर्जेदार वस्तूची खरेदी करणे ही ग्राहकाची जबाबदारी आहे. आय.एस.आय., अँगमार्क, हॉलमार्क, ई.पी.ओ., एफ.ए.एस.एस.आय.इ. मालाचा उत्तम दर्जा दर्शवितात.
  4. अतिशयोक्ती जाहिरातीपासून सावध राहणे: विक्रेते ग्राहकांना जाहिरातीद्वारे वस्तू व सेवेसंबंधीची माहिती देतात. परंतु जाहिरातीत उत्पादनाच्या दर्जासंबंधी अतिशयोक्ती करून माहिती दिली जाते. म्हणून जाहिरातीचे सत्य शोधणे ही ग्राहकाची जबाबदारी आहे.
  5. खरेदी पावती आणि गँरटी/वॉरंटी कार्डची मागणी करणे: ग्राहकाने खरेदी केलेल्या मालाची पावती मागितली पाहिजे. तसेच गँरटी आणि वॉरंटी कार्डवरील तपशील सविस्तरपणे तपासून घेणे ही ग्राहकाची जबाबदारी आहे. जर खरेदी केलेला माल निकृष्ट दर्जाचा निघाला तर खरेदी पावती, गँरटी/वॉरंटी कार्ड इ. दस्तऐवज, विक्रेत्यांशी असलेले वाद मिटविण्यास मदत करतात.
  6. पूर्व नियोजित खरेदी करणे: घाई-गडबडीत खरेदी न करणे ही एक ग्राहकाची महत्त्वाची जबाबदारी मानली जाते. म्हणजेच ग्राहक जी वस्तू खरेदी करू इच्छितो त्या वस्तू आणि वस्तूंचे प्रमाण यांचे पूर्वनियोजन केले पाहिजे. तसेच वस्तूची खरेदी कोणत्या ठिकाणाहून करायची आहे यासंबंधीचा विचार ग्राहकाने केला पाहिजे.
  7. संघटित प्रयत्न करणे: ग्राहकाने त्यांच्या अधिकाराचे संरक्षण आणि हिताच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तसेच ग्राहक कल्याणासाठी कार्य करणाऱ्या ग्राहक संरक्षण संस्थास मदत करण्यासाठी कार्य केले पाहिजे.
shaalaa.com

उत्तर २

  1. उपलब्ध असलेल्या वस्तू आणि सेवांच्या श्रेणीबद्दल माहिती ठेवा जेणेकरून तुम्ही हुशार आणि सुज्ञ निर्णय घेऊ शकाल.
  2. प्रमाणित वस्तू निवडा कारण त्या गुणवत्तेची खात्री देतात. इलेक्ट्रिकल वस्तूंवर आयएसआय मार्क, अन्नपदार्थांवर एफपीओ आणि दागिन्यांवर हॉलमार्क पहा.
  3. उत्पादने आणि सेवांशी संबंधित जोखीम समजून घ्या, उत्पादकाच्या सूचनांचे पालन करा आणि उत्पादने सुरक्षितपणे वापरा.
  4. किंमत, वजन, उत्पादन आणि कालबाह्यता तारखा आणि इतर आवश्यक तपशील जाणून घेण्यासाठी उत्पादन लेबल्स काळजीपूर्वक वाचा.
  5. तुम्हाला योग्य वागणूक मिळेल याची खात्री करण्यासाठी बोला आणि तुमचा आधार घ्या.
  6. तुमच्या व्यवहारात सत्यता बाळगा, फक्त कायदेशीर स्रोतांकडून खरेदी करा आणि काळाबाजार आणि साठेबाजीसारख्या अनैतिक पद्धतींना परावृत्त करा.
  7. खरेदी करताना नेहमीच कॅश मेमो मिळवा. हे व्यवहाराचा पुरावा म्हणून काम करते.
  8. तुम्ही खरेदी केलेल्या वस्तू किंवा सेवांमध्ये दोष आढळल्यास योग्य ग्राहक मंचात तक्रार दाखल करा.
  9. ग्राहकांच्या हिताचे शिक्षण आणि संरक्षण करण्यासाठी ग्राहक संघटनांमध्ये सहभागी व्हा किंवा त्यांची स्थापना करा.
  10. कचरा, कचरा आणि प्रदूषण टाळून पर्यावरणाबद्दल आदर दाखवा.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×