मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील तक्ता पूर्ण करा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील तक्ता पूर्ण करा.

अलैंगिक प्रजनन लैंगिक प्रजनन
1. कायिक पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात. 1. ____________________
2. __________________ 2. लैंगिक प्रजननासाठी नर जनक आणि मादी जनक अशा दोन जनकांची आवश्यकता असते.
3. हे प्रजनन फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते. 3. __________________
4. _____________________ 4. या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीय दृष्ट्या जनकांपेक्षा वेगळा असतो.
5. द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन, खंडीभवन, पुनर्जनन, शाकीय प्रजनन, बीजाणू निर्मिती, इत्यादी प्रकारे विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन केले जाते. 5. _____________________
तक्ता
Advertisements

उत्तर

अलैंगिक प्रजनन लैंगिक प्रजनन
1. कायिक पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात. 1. युग्मकांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास लैंगिक प्रजनन म्हणतात.
2. अलैंगिक प्रजननासाठी केवळ एकाच सजीवाची आवश्यकता असते. 2. लैंगिक प्रजननासाठी नर जनक आणि मादी जनक अशा दोन जनकांची आवश्यकता असते.
3. हे प्रजनन फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते. 3. हे प्रजनन सूत्री विभाजनाच्या आणि अर्धसूत्री विभाजनाच्या मदतीने होते.
4. या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीयदृष्ट्या तंतोतंत जनकासारखा (क्लोन) असतो. 4. या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीय दृष्ट्या जनकांपेक्षा वेगळा असतो.
5. द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन, खंडीभवन, पुनर्जनन, शाकीय प्रजनन, बीजाणू निर्मिती, इत्यादी प्रकारे विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन केले जाते. 5. लैंगिक प्रजनन केवळ दोन टप्प्यांत केले जाते. अर्धगुणसूत्री विभाजनाने युग्मके तयार करणे आणि नंतर या एकगुणित युग्मक यांच्या फलन द्विगुणित युग्मनज तयार करणे. लैंगिक प्रजननात इतर प्रकार नसतात.
shaalaa.com
प्रजनन (Reproduction) - लैंगिक प्रजनन (Sexual reproduction)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 - स्वाध्याय [पृष्ठ ३४]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2
स्वाध्याय | Q 1 | पृष्ठ ३४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×