मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील फरक स्पष्ट करा: समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील फरक स्पष्ट करा:

समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग

फरक स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

आधार समहक्क भाग अग्रहक्क भाग
१. अर्थ समहक्क भाग म्हणजे असे भाग जे अग्रहक्क भाग नसतात. अग्रहक्क भागांना काही अग्रक्रम हक्क दिले आहेत. लाभांश आणि कंपनी विसर्जनाच्या वेळी भागभांडवल परतफेडीसाठी यांचा अग्रक्रमाने विचार केला जातो.
२. लाभांशाचा दर लाभांशाचा दर कंपनीच्या नफ्यावर अवलंबून असतो त्यामुळे लाभांशाचा दर अनिश्चित असतो. अग्रहक्क भागधारकांना दिल्या जाणाऱ्या लाभांशाचा दर निश्चित असतो.
३. मतदानाचा हक्क समहक्क धारकांना सामान्यतः मतदानाचा हक्क असतो. कंपनीच्या व्यवस्थापनेमध्ये त्यांचा सहभाग असतो. अग्रहक्क धारकांना मर्यादित स्वरूपाचा मतदानाचा हक्क असतो. त्यांचे हितसंबंध ज्यामध्ये गुंतले आहेत अशाच मुद्द्यावर ते मतदान करू शकतात.
४. भांडवलाचे स्वरूप समहक्क भाग भांडवलाला ‘जोखमीचे भांडवल’ असे म्हटले जाते. अग्रहक्क भाग भांडवल हे ‘सुरक्षित भांडवल’ आहे. यांना स्थिर दराने परतावा मिळतो.
५. गुंतवणूकदाराचे स्वरूप जे गुंतवणूकदार जोखीम पेलण्यास तयार असतात ते समहक्क भाग खरेदी करतात. जे गुंतवणूकदार सजग/सावध असतात, ज्यांना सुरक्षित गुंतवणूक हवी असते ते अग्रहक्क भागांमध्ये गुंतवणूक करतात.
६. दर्शनी मूल्य समहक्क भागांचे दर्शनी मूल्य साधारणपणे रु. १ किंवा रु. १० असते हे तुलनेने कमी असते. अग्रहक्क भागांचे दर्शनी मूल्य तुलनेने जास्त असते. उदा. रु. १००
७. प्रकार

समहक्क भागांचे प्रकार -

  1. सर्वसाधारण मतदानाचा अधिकार असणार
  2. भेददर्शक मतदानाचा अधिकार असणारे

अग्रहक्क भागांचे प्रकार

  1. संचयी अग्रहक्क भाग
  2. असंचयी अग्रहक्क भाग
  3. लाभभागी अग्रहक्क भाग
  4. अलाभभागी अग्रहक्क भाग
  5. परिवर्तनीय अग्रहक्क भाग
  6. अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग
  7. परतफेडीचे अग्रहक्क भाग
  8. न परत फेडीचे अग्रहक्क भाग
८. भांडवल वृद्धी
समहक्क भागांचे बाजारमूल्य कंपनीच्या प्रगती बरोबर वाढत जाते. आग्रहक्क भागांचे बाजारमूल्य स्थिर असते त्यामुळे भांडवल वृद्धीची शक्यता नसते.
९. जोखीम
समहक्क भाग भांडवलात गुंतवणूक करण्यात जोखीम असते कारण लाभांशाचा अस्थिर दर व भांडवल परतफेडीची अनिश्चितता! अग्रहक्कभागांची गुंतवणूक तुलनेने सुरक्षित असते कारण लाभांशाचा दर स्थिर/निश्चित असतो व भांडवल परतफेडीसाठी अग्रक्रम दिला जातो.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×