मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

खालील अपठित उताऱ्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा. निसर्ग हा माणसाचा पहिला गुरू, निसर्गातील प्रत्येक घटकापासून माणूस खूप काही शिकला आहे शिकत आहे - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील अपठित उताऱ्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

निसर्ग हा माणसाचा पहिला गुरू, निसर्गातील प्रत्येक घटकापासून माणूस खूप काही शिकला आहे, शिकत आहे व पुढेही शिकू शकतो. तसं पाहिलं तर निसर्ग गुरूपेक्षा माणसाचा मित्र मानला पाहिजे असे एक मतही अगदी आग्रहाने मांडले जाते. माणसाच्या अगदी प्रारंभीच्या काळात खरी साथ दिली ती निसर्गाने अन्न, वस्त्र व निवारा या तिन्ही गरजा निसर्गाने भागविल्या. त्याचबरोबर प्रगतीसाठी आवश्यक ती साथही दिली. शेती, शिकार तसेच उपजीविकेसाठी, गरजा भागवण्यासाठी आवश्यक ते सर्व साहाय्य निसर्गाद्वारेच मिळत गेले.

निसर्ग माणसाला भरभरून देत राहिला, त्याचबरोबर माणूसही त्या काळात निसर्गाचा ऋणीच राहिला. पण कालांतराने माणसाच्या आशा वाढत गेल्या, माणूस सुखाच्या मागे धावत राहिला, त्याचबरोबर निसर्गाच्या प्रती असलेली ही भावना कमी होत गेली.

लेखन कौशल्य
Advertisements

उत्तर

निसर्ग हा माणसाचा आद्य गुरु आहे. निसर्गातील प्रत्येक घटकाकडून माणसाने काही ना काही शिकले आहे, शिकत आहे आणि पुढेही शिकत राहणार आहे. म्हणूनच निसर्गाचे रक्षण करणे माणसाचे कर्तव्य आहे, असे मत मांडले जाते. मानवी आदिम अवस्थेत निसर्गाने माणसाला खऱ्या अर्थाने साथ दिली. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीनही मूलभूत गरजा निसर्गानेच पूर्ण केल्या.

याशिवाय प्राण्यांपासून संरक्षणासाठी, शेती आणि शिकारीसाठी तसेच उपजीविकेसाठी आवश्यक असलेली साधनेही निसर्गानेच पुरवली. प्रारंभी माणूस निसर्गावर पूर्णपणे अवलंबून होता; परंतु कालांतराने ही भावना कृतज्ञतेतून बदलत गेली. सुखाच्या शोधात माणसाने निसर्गाचा अमर्याद वापर सुरू केला आणि त्यामुळे निसर्ग-माणूस नात्यात बदल झाला.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×