मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

खालील अपठित उताऱ्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा. ज्याप्रमाणे मनुष्यप्राण्याला अन्नाची जरुरी आहे, त्याप्रमाणे सर्वांना विद्येची जरुरी आहे. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील अपठित उताऱ्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

ज्याप्रमाणे मनुष्यप्राण्याला अन्नाची जरुरी आहे, त्याप्रमाणे सर्वांना विद्येची जरुरी आहे. विद्या ही दुधारी तलवारीसारखी असते. विद्येने दुष्टांचा संहार करता येतो व दुष्टांपासून रक्षणही करता येते.

माझ्या मते केवळ विद्याच पवित्र असू शकत नाही. प्रज्ञा म्हणजे शहाणपणा, शील म्हणजे सदाचरणयुक्त असं आचरण, करुणा म्हणजे सर्व मानवजातीसंबंधी प्रेमभाव आणि मैत्री म्हणजे सर्व प्राणिमात्रांविषयीची आत्मीयता. विद्येबरोबर या चार पारमिता असल्या पाहिजेत, तरच विद्वत्तेचा काही उपयोग आहे. विद्येबरोबर मानवाजवळ करुणा नसली तर तो दानव आहे, असं मी समजतो. विद्या, प्रज्ञा, करुणा, शील आणि मैत्री या पंचतत्त्वांनुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनवले पाहिजे आणि या मार्गाने एकट्याने जावे लागले, तरी मनोधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे.

लेखन कौशल्य
Advertisements

उत्तर

जसे अन्न मानवासाठी आवश्यक आहे, तसेच विद्या सर्वांसाठी आवश्यक आहे. परंतु केवळ विद्या पुरेशी नसून तिच्यासोबत प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री या गुणांचीही जोड असणे महत्त्वाचे आहे. या पंचतत्त्वांनुसारच विद्यार्थ्यांनी आपले चारित्र्य घडवावे. विद्येला करुणेची साथ नसेल, तर तिचा उपयोग होत नाही; म्हणून निष्ठा आणि मनोधैर्य ठेवून या मार्गाने चालणे आवश्यक आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×