Advertisements
Advertisements
प्रश्न
कच्च्या मालाच्या स्रोतानुसार उदयोगांचे वर्गीकरण करून सविस्तर माहिती लिहा.
सविस्तर उत्तर
Advertisements
उत्तर
- कृषीवर आधारित उद्योग: ज्या उद्योगांमध्ये शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनांचा कच्चा माल म्हणून उपयोग होतो, त्यांना कृषी-आधारित उद्योग म्हणतात. उदाहरणार्थ, साखर कारखाना आणि सुती कापड उद्योग.
- सागरी उत्पादनांवर आधारित उद्योग: सागरी जीवांचा किंवा उत्पादनांचा कच्चा माल म्हणूनवापर करणारे उदयोग म्हणजे सागरी उत्पादनांवर आधारित उदयोग होत. मासे हवाबंद डब्यात भरणे किंवा माशांचे तेल काढणे ही या उद्योगांची काही उदाहरणे आहेत.
- वनांवर आधारित उद्योग: जंगलातून मिळणाऱ्या उत्पादनांचा (वनमालाचा) कच्चा माल म्हणून वापर करणाऱ्या उद्योगांना वनांवर आधारित उद्योग म्हणतात. कागद निर्मिती आणि जहाजबांधणी ही या उद्योगांची प्रमुख उदाहरणे आहेत.
- खनिजांवर आधारित उद्योग: विविध खनिजांचा उपयोग कच्चा माल म्हणून करणाऱ्या उद्योगांना खनिजांवर आधारित उद्योग असे संबोधले जाते. लोह-पोलाद उद्योग आणि पेट्रोकेमिकल उद्योग ही या प्रकारच्या उद्योगांची उदाहरणे आहेत.
- प्राणिजन्य उद्योग: हे उद्योग पूर्णपणे पशुपालनातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर अवलंबून असतात, ज्यामध्ये मांस आणि दुग्धजन्य पदार्थांवरील प्रक्रियांचा समावेश होतो. या उद्योगांमध्ये प्राण्यांचे केस, कातडी, हाडे, शिंगे, दूध आणि मांस यांसारख्या गोष्टींचा वापर केला जातो. उदा., बॅगा, चपला व बूट इत्यादी. दुधापासून दूध उत्पादने जसे चीज, दही व मिष्टान्न हे पदार्थ बनवतात. रेशीम कापड, लोकरीचे कापड, जॅकेट इत्यादी वस्तू या उद्योगात तयार होतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
