मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

का ते लिहा. संभाजी महाराजांनंतर मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

का ते लिहा.

संभाजी महाराजांनंतर मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले.

कारण सांगा
Advertisements

उत्तर

  1. औरंगजेब संभाजी महाराजांना नमवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. त्याने मुकर्रबखान याची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली होती.
  2. महाराज कोकणातील संगमेश्‍वर येथे असल्याची बातमी मुकर्रबखानास कळली. तेव्हा त्याने छापा घालून संभाजी महाराजांना पकडले.
  3. संभाजी महाराजांना बादशाहापुढे नेण्यात आल्यानंतर त्याच्यापुढे ते अतिशय बाणेदारपणे वागले.
  4. मग बादशाहाच्या हुकमाने ११ मार्च १६८९ रोजी अत्यंत अमानुषपणे त्यांना ठार करण्यात आले.
  5. मराठ्यांचा हा छत्रपती स्वाभिमान न सोडता अत्यंत धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरा गेला.

त्यांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी मुघलांविरुद्धचा संघर्ष अधिकच तीव्र केला.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12: मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम - स्वाध्याय [पृष्ठ १३९]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 12 मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम
स्वाध्याय | Q ३. (२) | पृष्ठ १३९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×