Advertisements
Advertisements
प्रश्न
|
जे केलेच पाहिजे ते करावयाचे राहून जाते. जे नाही केले तरी चालेल ते न चुकता केले जाते. हे सर्वांच्या बाबतीत कधी ना कधी घडून जाते. काही गोष्टी स्वभावानुसार, गरजेनुसार केल्या जातात. तहान लागली की आपण पाणी पितो, भुकेच्या वेळी खातो. थकवा आला की बसतो, पडतो किंवा झोपतो; पण शरीरश्रम किंवा व्यायाम मुद्दाम कधीच करीत नाही. लहानपणी धावणे, पळणे, खेळणे खूप होते. मोठेपणी यातले मागे काही उरत नाही. स्त्रियांना तर त्यांच्या दिनचर्येची चाकोरी सोडून बाजूला सरकता येत नाही. हाल अधिक, पण हालचाल कमी अशी त्यांची स्थिती असते. आपल्या जीवनातील अनेक दुःखे केवळ शारीरिक हालचालींच्या आणि विशेषतः सर्वांगीण व शिस्तबद्ध व्यायामाच्या अभावातून निर्माण होतात; हे एक साधे सरळ जीवनसत्य माणसांना उमगत नाही. |
वरील गद्य उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
Advertisements
उत्तर
माणसे आपल्या आवडीनुसार आहार व विश्रांती घेतात; परंतु शरीर व मन सुदृढ ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सवयींकडे अनेकदा दुर्लक्ष करतात. बालपणानंतर खेळ व व्यायाम यांसारख्या आरोग्यदायी कृती केल्या जात नाहीत. विशेषतः स्त्रिया भरपूर काम करतात, तरीही व्यायामाकडे लक्ष देत नाहीत. ताणतणाव कमी करण्यासाठी आणि आरोग्य टिकवण्यासाठी नियमित व्यायाम महत्त्वाचा आहे, याची आपल्याला पुरेशी जाणीव होत नाही.
