मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

जैवविविधतेचे प्रकार सांगून त्यांची उदाहरणे लिहा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जैवविविधतेचे प्रकार सांगून त्यांची उदाहरणे लिहा.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

जैवविविधता तीन पातळ्यांवर दिसते. या पातळ्या पुढीलप्रमाणे आहेत:
आनुवंशिक विविधता, प्रजातींची विविधता, परिसंस्था विविधता.

  1. आनुवंशिक विविधता म्हणजे एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता, प्रत्येक प्राणी किंवा माणूस एकसमान नसतो.थोडे थोडे वेगळेपण प्रत्येकात असते.
  2. प्रजाती विविधता ही एकाच प्रदेशात एकाच प्रजातीच्या सजीवांमध्ये आढळून येते. प्रजाती विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो.
  3. परिसंस्था विविधता म्हणजे निरनिराळ्या प्रदेशांतून दिसून येणाऱ्या परिसंस्था होय. प्रत्येक प्रदेशातल्या अनेक परिसंस्थांत प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व अजैविक घटक वेगवेगळे असतात. एखाद्या प्रदेशातील सजीव आणि त्याचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधांतून परिसंस्थेची निर्मिती होते. अर्थात नैसर्गिक व मानवनिर्मित अशादेखील दोन स्वतंत्र परिसंस्था असतात.
shaalaa.com
पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता (Environmental conservation and Bio-diversity)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: पर्यावरणीय व्यवस्थापन - स्वाध्याय [पृष्ठ ४६]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 4 पर्यावरणीय व्यवस्थापन
स्वाध्याय | Q 6. इ. | पृष्ठ ४६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×