मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

ग्रॅफाइट विद्युत वाहक असते हे एका छोटया प्रयोगाने कसे सिद्ध कराल?

Advertisements
Advertisements

प्रश्न

ग्रॅफाइट विद्युत वाहक असते हे एका छोटया प्रयोगाने कसे सिद्ध कराल?

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. उद्देश्य: ग्रॅफाइट विद्युतवाहक आहे हे सिद्ध करणे.
  2. साहित्यः पेन्सिल, विद्युतवाहक तारा, बॅटरी/सेल, लहान बल्ब.
  3. कृती:
    1. पेन्सिलला दोन्ही बाजूंनी टोक काढा.
    2. आता, पेन्सिलीची दोन्ही टोके विद्युत तारांनी जोडा. तारेचे एक टोक सेलला/बॅटरीला व दुसरे टोक छोटया बल्बला जोडा. बल्बची दुसरी बाजू व बॅटरीची दुसरी बाजू आणखी एका छोटया तारेने जोडा.
    3. परिपथात विद्युत प्रवाह सुरू करा व निरीक्षण करा.
  4. आकृती:

             ग्रॅफाइटमधून विद्युतधारा वाहते.
  5. निरीक्षणः परिपथात असलेला विद्युत बल्ब प्रकाशित होतो.
  6. अनुमान/निष्कर्ष: ह्या प्रयोगावरून असे सिद्ध होते, की ग्रॅफाइट पेन्सिलमधील हे विद्युत सुवाहक आहे.
shaalaa.com
अपरूपता व कार्बनची अपरूपे - कार्बनचे स्फटिक रूप : ग्रॅफाइट
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य - स्वाध्याय [पृष्ठ १४९]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 13 कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य
स्वाध्याय | Q 8. आ. | पृष्ठ १४९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×