मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

ग्राहक संरक्षणाच्या कोणत्याही चार गरजा स्पष्ट करा. - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

प्रश्न

ग्राहक संरक्षणाच्या कोणत्याही चार गरजा स्पष्ट करा.

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  1. ग्राहक सहभागाची गरज: बहुतांश वेळा असे आढळून येते की, ग्राहक हिताचे अनेक निर्णय ग्राहकांशी किंवा ग्राहक संघटनेशी चर्चा न करताच घेतले जातात. फक्त मोठ्या ग्राहक संघटना, व्यवसाय संस्थावर ग्राहकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासंबंधी दबाव निर्माण करू शकतात.
  2. माहितीचा अभाव: आजचा ग्राहक हा अतिशय गतिशील आणि गुंतागुंतीचे जीवन जगत असल्याने तसेच तो विखुरलेला असल्याने ग्राहक आणि उत्पादक यांच्यात प्रत्यक्ष संवाद निर्माण करणे खूपच कठीण झाले आहे. आजच्या बाजारपेठेत देशी उत्पादनाबरोबरच विदेशी उत्पादनेसुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने ग्राहकांना वस्तू खरेदीपूर्व योग्य आणि विश्वसनीय माहिती मिळणे कठीण बनले आहे.
  3. ग्राहकांचे अज्ञान: व्यवसायाकडून केल्या जाणाऱ्या शोषणास ग्राहकाचे अज्ञान कारणीभूत मानले जाते. भारतीय ग्राहकांत बाजारपेठेची परिस्थिती, ग्राहकांचे अधिकार, किंमत पातळी आणि उत्पादनाचा तपशील इ. बाबतीत अज्ञान दिसून येते. म्हणून व्यापाऱ्याच्या अनिष्ट व्यापारी प्रथांपासून ग्राहकांचे संरक्षण करणारी यंत्रणा आवश्यक आहे.
  4. असंघटित ग्राहक: ग्राहक हे सर्वत्र विखुरलेले आणि असंघटित आहेत. तर याउलट विक्रेते ग्राहकांच्या तुलनेत अधिक सुस्थितीत आणि सामर्थ्यशाली आहेत. म्हणून ग्राहक विक्रेत्यांच्या प्रभावाखाली असतात. एकटा ग्राहक सामर्थ्यशाली विक्रेत्याविरुद्ध आवाज उठवू शकत नाही.
  5. बनावट वस्तू: बाजारपेठेत बनावट (नकली) उत्पादनाचा पुरवठा वाढत आहे. सामान्य ग्राहकास अस्सल उत्पादने आणि नकली उत्पादने यात फरक करणे शक्‍य नसते. म्हणून उत्पादनाचा दर्जा आणि सुरक्षितता व मानके इ. संबंधीचे नियम तयार करून त्यांच्या पालनाची सुनिश्चितता करून ग्राहकाचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
  6. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती: काही उत्पादक उत्पादनाचा दर्जा, सुरक्षितता आणि उपयुक्तता इत्यादी बाबतीत ग्राहकांची दिशाभुल होईल अशी माहिती देतात. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे उत्पादनाचा दर्जा ओळखणे कठीण जाते, परिणामी ग्राहकांची दिशाभूल होते. म्हणून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर प्रतिबंध करणाऱ्या यंत्रणेची गरज आहे.
  7. व्यवसायातील गैरप्रकार: व्यावसायिक फसव्या, अनैतिक आणि मक्तेदारीयुक्त व्यापारी प्रथांद्वारे ग्राहकांचे शोषण करतात. यामुळे बहुतांश वेळा ग्राहकास सदोष, निकृष्ट आणि हलक्‍या दर्जाच्या वस्तू स्वीकाराव्या लागतात. व्यापारी गैरप्रकारांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी निश्चित उपाययोजनांची आवश्यकता आहे.
  8. विश्वस्त व्यवस्था: गांधी तत्त्वज्ञानानुसार व्यावसायिक हे समाजाच्या संपत्तीचे विश्वस्त असतात. म्हणून व्यावसायिकांनी सामाजिक संपत्तीचा वापर जनतेच्या हितासाठी करणे आवश्यक आहे.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×