मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

चकाकणारा दगड सापडल्यानंतर राजूची झालेली मन:स्थिती, याबाबतचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

चकाकणारा दगड सापडल्यानंतर राजूची झालेली मन:स्थिती, याबाबतचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. 

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

चकाकणारा दगड राजूला रस्त्यात सापडला. तो त्याने भिरकावताच चेंडूसारखा उड्या मारत लांब थांबला; तेव्हा राजुला आश्चर्य वाटले. तो दगड त्याने टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला. रात्री त्यातून प्रखर लहरी निघत होत्या व त्या दगडाने छोट्या दगडाला जन्म दिला. या घटनेची राजूला भीतिमिश्रित गंमत वाटली. सकाळी उठून राजू वेगाने टेबलाकडे धावला. लहान व मोठे धोंडे पाहून त्याचे हृदय धडधडले. राजूने दोन्ही धोंडे खिशात टाकले व तो शाळेत गेला. जेव्हा शिक्षक व मित्रांनी त्याचे म्हणणे टाळले, तेव्हा तो निराश झाला. त्याची घालमेल झाली व तो अस्वस्थ झाला. राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला. शास्त्रज्ञांनी त्या परग्रहावरील धोंड्याचा शोध लावून त्याचे श्रेय राजूला दिले तेव्हा राजूला आनंद झाला.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 19: धोंडा - स्वाध्याय [पृष्ठ २१]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 19 धोंडा
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ २१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×