मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ७ वी

चित्र पाहा. संवाद वाचा. आई : अरे जॉर्डन, किती हा तुझ्या कपड्यांचा ढीग? आपल्याला लहान झालेले, पण इतरांना वापरता येतील अशा कपड्यांचे तुम्ही काय करता? - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

चित्र पाहा. संवाद वाचा.


आई: अरे जॉर्डन, किती हा तुझ्या कपड्यांचा ढीग?
जाॅर्डन: आई, काय करू मी या जुन्या कपड्यांचं?
आई: मुळात आवश्यक आहे तेवढेच नवीन कपडे घ्यावेत. त्यांचा पुरेपूर वापर करावा.
जाॅर्डन: अगं हो, पण आता काय करू ते सांग ना!
आई: यातले जे कपडे वापरण्यासाठी चांगले आहेत, ते बाजूला कर. जे तुझ्या अंगाला येत नाहीत, जे फाटले आहेत ते वेगळे वेगळे कर.
जाॅर्डन: आई, आपण या जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करू शकतो का?
आई: हो, नक्कीच. त्यासाठी आपल्यात फक्त कलात्मकता पाहिजे.
जाॅर्डन: आई, काय काय बनवता येईल गं या कपड्यांचं?
आई: तुला सुट्टी आहे ना आज, चल आपण दोघं मिळून बनवूया.
(आई जॉर्डनला पर्स, तोरण, पायपुसणी बनवून दाखवते.)
जाॅर्डन: आई, किती छान झाल्यात गं या वस्तू. खूपच छान दिसत आहेत. खरंच, आपण जुन्या कपड्यांपासून वेगवेगळ्या सुंदर वस्तू बनवू शकतो. यामुळे नक्कीच जुन्या कपड्यांचा पुनर्वापर होईल.

आपल्याला लहान झालेले, पण इतरांना वापरता येतील अशा कपड्यांचे तुम्ही काय करता?

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

कपडे लहान झाले, की माझी आई ते कपडे स्वच्छ धुवून वाळवते व त्या कपड्यांना इस्त्री करून ते कपडे अनाथालयातील मुलांना देते किंवा आमच्याकडे घरकाम करणाऱ्या मावशीच्या मुलांना देते.

shaalaa.com
गद्य (7th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11.2: आपली समस्या आपले उपाय - २ - विचार करा. सांगा. [पृष्ठ ४३]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 11.2 आपली समस्या आपले उपाय - २
विचार करा. सांगा. | Q १ | पृष्ठ ४३
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [Hindi Medium] Maharashtra State Board
पाठ 2.6 आपली समस्या आपले उपाय - २
विचार करा. सांगा. | Q १ | पृष्ठ ४१
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik [English] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 11.2 आपली समस्या आपले उपाय - २
विचार करा. सांगा. | Q १ | पृष्ठ ४०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×