Advertisements
Advertisements
प्रश्न
भारतातील सर्वात प्रभावी मराठी सत्ता का संपुष्टात आली?
भारतातील सर्वात प्रभावी मराठी सत्ता संपुष्टात आली.
सविस्तर उत्तर
Advertisements
उत्तर
भारतातील सर्वांत प्रभावी असलेल्या मराठी सत्तेच्या अंताची कारणे -
- नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांची मदत घेतल्यामुळे त्यांना मराठ्यांच्या राज्यकारभारात प्रवेश मिळाला.
- रघुनाथराव यांनी पेशवेपदासाठी इंग्रजांकडे मदत मागितली व ते इंग्रजांच्या आश्रयाला गेले.
- नाना फडणविसाने इंग्रजांविरुद्ध उभ्या केलेल्या चतुःसंघातून इंग्रजांनी निजामाला फोडून आपल्या गोटात घेतले.
- मराठ्यांनी खड्याच्या लढाईत निजामाचा पराभव केला तरीही या लढाईत मराठ्यांच्या छावणीत असलेल्या इंग्रज वकिलाने मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा अभ्यास करून त्या आधारे लॉर्ड वेलस्ली याने मराठ्यांचा पराभव केला.
- हिंदुस्थानात इंग्रजांची सत्ता स्थापन करायची असेल तर मराठ्यांचा पराभव केला पाहिजे, असे वॉरन हेस्टिंग्जच्या लक्षात आल्यावर, त्याने त्याप्रमाणे योजना आखल्या.
- मराठा सरदारांना एकत्र आणून मुत्सद्दीपणाने कारभार करणाऱ्या नाना फडणविसांचा मृत्यू झाला.
- दुसरा बाजीराव पेशवा मराठा सरदारांना एकत्र ठेवू शकला नाही.
- इंदौरचे होळकर व पेशवा यांच्यात आलेल्या वितुष्टामुळे यशवंतराव होळकर याने पुण्यावर आक्रमण केले.
- दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांच्या आश्रयाला जाऊन त्यांच्याशी वसईचा तह केला.
- शिंदे-होळकर यांना हा तह अमान्य होऊन १८०३ साली झालेल्या दुसऱ्या इंग्रज-मराठे युद्धात मराठा सरदारांचा पराभव झाला.
- १८१७ साली झालेल्या तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला. १८१८ साली मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली.
shaalaa.com
Notes
विद्यार्थ्यांनी आपल्या पसंतीच्या गुणांनुसार उत्तराचा संदर्भ घ्यावा.
मराठी सत्तेचे वसाहतवादविरोधी धोरण - इंग्रज - मराठे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
