मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती?

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत:

  1. भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो. हा प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो.
  2. हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत आणि पश्चिमेकडील राजस्थान-पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत उत्तर भारतीय मैदान या प्राकृतिक विभागाचा विस्तार आढळतो. हा प्रदेश बहुतांशी सखल व सपाट आहे.
  3. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे प्रामुख्याने तीन विभाग केले जातात.
  4. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे.
  5. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या बहुतांश भागात व बांग्लादेशात गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मुखांशी त्रिभुज प्रदेश आढळतो. या प्रदेशास 'सुंदरबन' म्हणतात हा जगातील सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश आहे.
  6. उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हा मैदानी प्रदेश 'थरचे वाळवंट' किंवा 'मरुस्थळ' या नावाने ओळखला जातो. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे. थरच्या वाळवंटाच्या उत्तरेकडील भाग पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो.
  7. अरवली पर्वत व दिल्ली डोंगररांगा यांच्या पश्चिमेकडे पंजाबचा मैदानी प्रदेश पसरलेला आहे. या प्रदेशाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून झाली आहे.
  8. पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आढळतो. या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याचे आढळून येते.
shaalaa.com
भारताची प्राकृतिक रचना
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: प्राकृतिक रचना व जलप्रणाली - स्वाध्याय [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली
स्वाध्याय | Q २. (इ) | पृष्ठ २३
एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
पाठ 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. | Q 4

संबंधित प्रश्‍न

अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

अरवली पर्वताच्या पायथ्याशी ________. 


भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा.


टिपा लिहा.

हिमालय


भौगोलिक कारणे लिहा.

भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते.


भौगोलिक कारणे लिहा.

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.


अचूक गट ओळखा:

भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमवार आढळतात.


फरक स्पष्ट करा.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेश व ब्रझील मैदानी प्रदेश


विधानावरून प्रकार ओळखा.

भारतातील हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे.


खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न-

  1. विंध्य पर्वत कोणत्या नदीखोऱ्यांचा जलविभाजक आहे?
  2. द्वीपकल्पावरील दक्षिणवाहिनी नदीचे नाव काय आहे?
  3. अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारांदरम्यान असलेल्या पठारांची नावे लिहा.
  4. पूर्व घाटातील शिखराचे नाव सांगा.
  5. सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×