मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

भाग बाजाराची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

भाग बाजाराची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  1. प्रतिभूतींचा बाजार: भाग बाजार हे एक असे स्थान आहे जेथे सर्व प्रकारच्या कंपन्या, सरकारी, निमसरकारी प्रतिभूतींचा व्यवहार केला जातो.
  2. प्रतिभूतींचा पुनर्व्यवहार: भाग बाजारात कंपन्यांनी अगोदर विक्री केलेल्या प्रतिभूतींच्या खरेदी-विक्रीचे पुनर्व्यवहार होत असतात. अनेक गुंतवणूकदारांमध्ये आपल्याकडील प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होतात.
  3. सूचिबद्ध केलेल्या प्रतिभूती: भाग बाजारात फक्त सूचिबद्‌ध केलेल्या/नोंदविलेल्या प्रतिभूतीचेंच व्यवहार करता येतात. सूचिबद्ध कंपन्यांची यादी गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करते; कारण अशा कंपन्यांना भाग बाजाराने ठरवून दिलेल्या कठोर नियमांचे काटेकोर पालन करावे लागते.
  4. संघटित आणि नियमन केलेला बाजार: भाग बाजारात सूचिबद्ध केलेल्या कंपन्यांना भाग बाजार व सेबीने ठरवून दिलेल्या नियमांचे, मार्गदर्शक सूचनांचे व कायद्याचे पालन करावे लागते.
  5. निश्‍चित स्थान: भाग बाजार ही विशिष्ट अशी भौतिक जागा आहे जेथे प्रतिभूतींचा व्यवहार केला जातो. ही एक अशी बाजारपेठ आहे जेथे दलाल व मध्यस्थ व्यवहार करण्यासाठी एकत्र येतात. आता भाग बाजारातील सर्व व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जातात.
  6. केवळ सदस्यांद्वारे व्यवहार: भाग बाजारातील प्रतिभूतींचे व्यवहार हे भाग बाजाराचे सदस्य किंवा अधिकृत दलाल यांच्या मार्फतच केले जाऊ शकतात.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×