मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

अन्नसाखळी व अन्नजाळे यांच्यामधील आंतरसंबंध सविस्तर स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

अन्नसाखळी व अन्नजाळे यांच्यामधील आंतरसंबंध सविस्तर स्पष्ट करा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरू असतात. या आंतरक्रियेत एक क्रम असतो, त्याला अन्नसाखळी म्हणतात.
  2. प्रत्येक साखळीत अशा चार वा पाचहून अधिक कडया असतात. उदा. एखादा कीटक अनेक प्रकारच्या वनस्पतींची पाने खातो मात्र तोच कीटक बेडूक, पाल, पक्षी यांचे भक्ष्य होतो. बेडूक सापाचे भक्ष्य, तर साप गरुड किंवा घारीचे भक्ष्य असतो. याप्रमाणेच ससा जंगली मांजर व कोल्ह्याचे भक्ष्य असतो व हे प्राणी सिंहाचे भक्ष्य असतात.
  3. परिसंस्थेत अशाप्रकारच्या अनेक अन्नसाखळ्या एकमेकांशी विविध स्तरांवर जोडलेल्या असतात, जर हे एखाद्या आकृतीने दाखवायचे म्हटले तर सरळ रेषेतील अन्नसाखळी ऐवजी गुंतागुंतीचे, अनेक शाखा असलेले जाळे तयार होईल. त्यालाच निसर्गातील ‘अन्नजाळे’ (Food Web) म्हणतात.
shaalaa.com
अन्नसाखळी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह - स्वाध्याय [पृष्ठ ८७]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 7 परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह
स्वाध्याय | Q 6. | पृष्ठ ८७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×