मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत सांगा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत सांगा.

सविस्तर उत्तर
Advertisements

उत्तर

वारकरी संप्रदायातील थोर संतकवी संत नामदेवांनी 'अंकिला मी दास तुझा' या अभंगात आई-बाळ, पक्षीण-तिची पिल्ले, गाय-वासरू, हरिणी-तिचे पाडस अशा विविध उदाहरणांतून मातृप्रेमाचे वर्णन केले आहे.

आई आणि मुलाचे नाते अत्यंत जवळचे, जिव्हाळ्याचे असते, म्हणून आपल्या मुलाला संकटात पाहून कोणतीही आई कशाचीही पर्वा न करता आपल्या बाळाकडे धाव घेते, त्याला त्या संकटातून बाहेर काढते. आगीच्या जवळ जाणाऱ्या किंवा आगीच्या तडाख्यात सापडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी त्याची माऊली धाव घेते. पक्षीण जरी आकाशात विहार करत असली तरी आपली पिल्ले जमिनीवर कोसळताच त्यांच्या चिंतेने ती लगेच खाली झेप घेते. भुकेले वासरू जेव्हा गायीच्या दुधासाठी हंबरू लागते, तेव्हा ती गायही सारे काही सोडून आपल्या पिल्लाकडे हंबरत धाव घेते. वनात फिरणाऱ्या हरिणीला वणवा लागल्याचे कळताच ती पाडसाच्या चिंतेने व्याकुळ, कावरीबावरी होते, आपल्या पिल्लाजवळ धाव घेते.

अशाप्रकारे, संतकवी नामदेवांनी या अभंगातून आई, पक्षीण, गाय, हरिणी या मातांच्या ममतेचे, कनवाळू वृत्तीचे समर्पक वर्णन केले आहे.

shaalaa.com
अंकिला मी दास तुझा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.1: संतवाणी - अंकिला मी दास तुझा-संत नामदेव - कृती [पृष्ठ ३]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2.1 संतवाणी - अंकिला मी दास तुझा-संत नामदेव
कृती | Q (४)(आ) | पृष्ठ ३

संबंधित प्रश्‍न

'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.

गाय हंबरत धावते ______.


आकृती पूर्ण करा.


कोण ते लिहा.

परमेश्वराचे दास -


कोण ते लिहा.

मेघाला विनवणी करणारा -


खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘सवेंचि झेंपावें पक्षिणी। पिलीं पडतांचि धरणीं॥
भुकेलें वत्सरावें। धेनु हुंबरत धांवे॥’


संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.


पक्ष्याच्या/प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा.


कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०८)

१. चौकटी पूर्ण करा. (०२)

 अ) आगीत पडणारे - ______ 

 ब) हुंबरत धावणारी - ______

अग्निमाजि पडे बाळू।

माता धांवें कनवाळू।।१।।

तैसा धांवें माझिया काजा।

अंकिला मी दास तुझा।।२।।

सवेंचि झेंपावें पक्षिणी।

पिलीं पडतांचि धरणीं।।३।।

भुकेलें वत्सरावें।

धेनु हुंबरत धांवे।।४।।

वणवा लागलासे वनीं।

पाडस चिंतीत हरणी।।५।।

नामा म्हणे मेघा जैसा।

विनवितो चातक तैसा।।६।।

२. आकृती पूर्ण करा. (०२)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (०२)

१. धरणी -

२. वन -

३. मेघ -

४. काजा -

४- काव्यसाैंदय

'तैसा धांवे माझिया काज। अंकिला मी दास तुझा।।' या ओळीतील भावसाैंदर्य स्पष्ट करा. (०२)


पुढील कवितेच्या त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

'अंकिला मी दास तुझा' गुण (०८)

मुद्दे:

१. प्रस्तुत कवितेचे कवी/ कवयित्री- (०१)

२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)

३. कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा- (०२)

'सवेंची झेपावे पक्षिणी। पिल्ली पडतांची धरणी।।'

४. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण- (०२)

५. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश- (०२)

६. प्रस्तुत शब्दांचा अर्थ- (०२)

१. अंकिला -

२. माता -

३. दास -

४. मेघ -


खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे 'अंकिला मी दास तुझा'
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
2. प्रस्तुत कवितेचा विषय  
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. 'अग्निमाजि पडे बाळू ।
माता धांवें कनवाळू।।'
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. i. काज - 
ii. सवें -
iii. पाडस -
iv. धेनू -

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. खालील कृती केव्हा घडतात, ते लिहा: (२)

  1. माता धावून जाते ______
  2. धरणीवर पक्षिणी झेपावते ______
  3. गाय हंबरत धावते ______
  4. हरिणी चिंतित होते ______

अग्निमाजि पडे बाळू।
माता धांवें कनवाळू।।१।।

तैसा धांवें माझिया काजा।
अंकिला मी दास तुझा।।२।।

सवेंचि झेंपावें पक्षिणी।
पिलीं पडतांचि धरणीं।।३।।

भुकेलें वत्सरावें।
धेनु हुंबरत धांवे।।४।।

वणवा लागलासे वनीं।
पाडस चिंतीत हरणी।।५।।

नामा म्हणे मेघा जैसा।
विनवितो चातक तैसा।।६।।

२. कोण ते लिहा. (२)

  1. परमेश्वर कृपेची याचना करणारे - ______
  2. मेघाची विनवणी करणारा - ______
  3. भुकेलेले - ______
  4. भक्ताच्या हाकेला धावून येणारा - ______

३. आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. (२)

४. ‘तैसा धांवें माझिया काजा। अंकिला मी दास तुझा ।।’ या ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. (२)


खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘अंकिला मी दास तुझा’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘नामा म्हणे मेघा जैसा।
विनवितो चातक तैसा॥’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) अंकिला -
(ii) कनवाळू -
(iii) माझिया -
(iv) वणवा -

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

कृती ‘अंकिला मी दास तुझा’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -   
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -   
(3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण -   
(4) दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ -  ‘वणवा लागलासे वनीं। पाडस चिंतीत हरणी ॥’
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ -  (i) माता -
(ii) कनवाळू -
(iii) काज -
(iv) धेनू -

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×