Advertisements
Advertisements
प्रश्न
30 सेमी त्रिज्येचा एक भरीव गोल वितळवून त्यापासून 10 सेमी त्रिज्या व 6 सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचित्ती तयार केल्या, तर किती वृत्तचित्ती तयार होतील?
बेरीज
Advertisements
उत्तर
समजा n वृत्तचिती तयार होतील.
गोलाची त्रिज्या (r) = 30 सेमी
वृत्तचितीची त्रिज्या (R) = 10 सेमी
वृत्तचितीची उंची (H) = 6 सेमी
∴ गोलाचे घनफळ = `4/3 pir^3`
= `4/3 xx pi(30)^3`
= 4 × π × 10 × (30)2
= 4 × π × 9000
= 36000 π
वृत्तचितीचे घनफळ = πR2H
= π × (10)2 × 6
= π × 100 × 6
= 600 π
∴ गोलापासून बनवता येणाऱ्या वृत्तचित्तीची संख्या = `("गोलाचे घनफळ")/("वृत्तचितीचे घनफळ")`
= `(36000 π)/(600 π)`
= 60
∴ एकूण 60 वृत्तचिती तयार होतील.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
