Advertisements
Advertisements
प्रश्न
उताऱ्याच्या आधारे सूचनांनुसार कृती करा:
(१) कोण ते लिहा: (२)
- ज्ञानक्षेत्रासाठी व्यक्तिजाणिवांना प्राधान्य देणारे - ........
- अविद्या हे सर्व अनर्थाचे मूळ आहे असे सांगणारे - ........
| शिक्षण हे पवित्र आहे आणि त्याचे पावित्र्य राखण्याची नितांत गरज आहे, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची श्रद्धा आहे. शिक्षण हा एकूणच मानवी जीवनाचा पायाभूत संस्कार आहे आणि शाळा हे संस्कारकेंद्र आहे. थोर समाजचिंतकांनी 'विद्ये'ला, 'ज्ञाना'ला महत्त्व का दिले याचे इंगित हेच आहे. विद्या जीवनाला वळण देते, सुधारते. विद्येची वाढ होणे सार्वजनिक हितासाठी आवश्यक असल्याचे लोकहितवादींनी प्रतिपादिले होते. नव्या ज्ञानाचे दरवाजे उघडण्यासाठी प्राचीन व्यवस्थेची चिकित्सा करणे त्यांना आवश्यक वाटत होते. गोपाळ गणेश आगरकर नव्या ज्ञानक्षेत्रासाठी व्यक्तिजाणिवांना प्राधान्य देत होते, तर महात्मा जोतीराव फुले यांनी 'विद्येविना मती गेली' असे विद्येचे महत्त्व प्रतिपादून 'अविद्या हे सर्व अनर्थाचे मूळ आहे' असे सांगितले. |
(२) विधाने पूर्ण करा: (२)
- शाळा हे --------
- 'विद्येविना --------'
आकलन
Advertisements
उत्तर
-
- ज्ञानक्षेत्रासाठी व्यक्तिजाणिवांना प्राधान्य देणारे - गोपाळ गणेश आगरकर
- अविद्या हे सर्व अनर्थांचे मूळ आहे असे सांगणारे - महात्मा जोतीराव फुले
-
- शाळा हे संस्कारकेंद्र आहे.
- 'विद्येविना मती गेली.'
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
