मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

(१) कारणे लिहा: रेखामावशींची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर, चंदेरी आहेत; कारण - स्नेहलने कॉलेजला जाताना सायकल वापरण्याचा निर्णय घेतला; कारण - “काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या कार्बन - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

(अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१)  कारणे लिहा:    [२]

  1. रेखामावशींची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर, चंदेरी आहेत; कारण......
  2. स्नेहलने कॉलेजला जाताना सायकल वापरण्याचा निर्णय घेतला; कारण......

“काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. रेखामावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर, चंदेरी आहेत '', सुमित बोलत होता. “बापरे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो; पण आपण तर अवघं वातावरणच घाण, प्रदूषित करीत असतो. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो, आपल्या पायांना! ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तापानं फणफणलीय आपली धरती, आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखामावशींसारखे चंदेरी हवेत”, स्नेहल गहिवरून म्हणाली.

अभिषेक भारावून म्हणाला, “माझ्या तर कॉलेजसमोरच बसस्टॉप आहे. आजपासून मी बसनंच ये-जा करणार. ठरलं एकदम!"

“खरंय पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलोय आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरिता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर॒ आपल्याला कमीपणाचं वाटतं; पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट”, अभिषेकचे बाबा म्हणाले.

(२) उत्तरे लिहा:    [२]

  1. अभिषेकने केलेला निश्‍चय .........
  2. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्याची आवश्यकता .........

(३) स्वमत:

'तापानं फणफणलीय आपली धरती ही स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा.    [३]

आकलन
Advertisements

उत्तर

  1.   
    1. रेखामावशींची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर, चंदेरी आहेत, कारण रेखामावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वाव नाही. 
    2. स्नेहलने कॉलेजला जाताना सायकल वापरण्याचा निर्णय घेतला, कारण तिला तिचे पाय रेखामावशींसारखे चंदेरी हवे आहेत.
  2.    
    1. अभिषेकने केलेला निश्‍चय आजपासून मी बसनंच ये-जा करणार.
    2. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्याची आवश्यकता आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरावे
  3. डॉ. प्रदिप आवटे लिखित 'फ्रूटप्रिन्टस' या विज्ञानकथेत लेखकाने आपल्या पृथ्वीला प्रदूषणापासून कसे वाचवायचे याची शिकवण दिली आहे.
    दिवसागणिक पृथ्वीवरील जागतिक तापमानात खूप वाढ होत आहे, जणू आपली धरती तापाने फणफणत आहे. त्यामुळे वणवे, दुष्काळ, उष्माघात इ. संकटांची तीव्रता वाढण्याचा धोका आहे. धुवीय प्रदेशात बर्फ वितळत आहे, ही पूर्व सूचना लक्षात घेऊन वसुंधरा दिन, पर्यावरण दिन यांचे औचित्य साधून वृक्षदिंडी, वृक्षारोपण इ. कार्यक्रम करून जनप्रबोधन करावे.
    वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे हिरवीगार वनश्री नष्ट होऊन सिमेंटची जंगले व टॉवर संस्कृती वाढते आहे. हवेतील कार्बनचे प्रमाण वाढत आहे.
    वैयक्तिक वाहनांचा शक्यतो उपयोग कमी करून, सार्वजनिक वाहनांचा उपयोग करावा. बाईक-मोटारगाड्या यांच्या वापरातून कार्बनचे प्रमाण वाढते. पेट्रोल-डिझेलवर चालणारी वाहने टाळावीत. बैलगाडी, सायकली ही वाहने वापरावीत. थोड्या अंतरासाठी पायी चालावे.
    सौरऊर्जा, पवनऊर्जा इ. साधनांचा वापर वाढवावा. सोलार पॅनल्स घराच्या गच्चीवर बसवावेत. पर्जन्यबिंदू साठवावेत.
    झाडांमुळे हवा शुद्‌ध व थंड होते, म्हणून झाडे तोडू नयेत. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवावेत. कचऱ्याचे खत करून झाडे वाढवावीत. कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी म्हटल्याप्रमाणे -
    'उधळू फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे
    गच्च माजतील राने, होईल आभाळातून वृष्टी'
    पर्जन्यवृष्टीमुळे हिरवीगार वनश्री वाढेल. हवा शुद्ध व शीतल होईल. प्रत्येकानेच असे प्रयत्न केल्यास जागतिक तापमानवाढ कमी होईल.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2022-2023 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×