हिंदी

HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा - Maharashtra State Board Question Bank Solutions for Marathi

Advertisements
[object Object]
[object Object]
विषयों
मुख्य विषय
अध्याय
Advertisements
Advertisements
Marathi
< prev  101 to 120 of 192  next > 

पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

शहाणंसुरतं राहायचं असेल, तर वाचनाचा छंद लागतोच. पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षरआनंदाची सोबत. ही सोबत तुम्हांला कधीच दगा देत नाही. या आनंदासाठी टिच्चून पैसे मोजावे लागत नाहीत. तुमचा हा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात, तेव्हा परमेश्वराचा धावा करतात. काहीजण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात, त्यादृष्टीनं पुस्तकाला परमेश्वरच म्हणायला हवं. अशा वेळी मित्रही हवे असतात; पण ते काही नेहमी उपलब्ध नसतात. पुस्तकं म्हणजे कायम उपलब्ध असलेले मित्र असतात.

निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकांची संगत असेल, तर माणूस जगाच्या पाठीवर कुठंही एकटा राहू शकतो. एकटं असण्यातही एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही स्वत:च्या अंतरंगात हलकेच डोकावू शकता, स्वत:ला ओळखू शकता, स्वत:शी संवाद साधू शकता. एकटे असताना तुम्ही विचार करू शकता, एकटं असतानाच तुम्हांला नव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार असतात. जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो, थेट जीवनाच्या सोबतीनंच जगू शकतो, दु:ख त्याच्या वाटेला कधीच जात नाही!

आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. भूतकाळाची स्मृती आणि भविष्याची भीती या दोन्हींपासून मन मुक्त होतं, तेव्हाच ते आनंद अनुभवू शकतं. भूतकाळ संपलेला असतो, भविष्यकाळ अनिश्चित असतो. खरा असतो तो फक्त वर्तमानकाळ. तोच भरभरून जगायचा असतो.

वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं. जगण्याची हौस हवी. ही हौस नसेल, तर ‘आजचं काम उद्या करू’ असं होतं. काम उद्यावर ढकललं जातं किंवा कसंतरी उरकलं जातं. आपण सगळंच उरकून टाकत असतो. अंघोळ उरकतो, जेवण उरकतो, काम उरकतो. एका अर्थी आपण जगणंही उरकतोच. मग आनंद कसा घेणार?

(१) सूचनेनुसारपुढील आकृतिबंध पूर्ण करा. (2)

(i)

(ii) आनंद अनुभवण्यासाठी या गोष्टीपासून
मन मुक्त असावं लागत

(२) ‘पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षरआनंदाची सोबत' या विधानाचा अर्थ तुमच्या भाषेत लिहा. (2)

(३) स्वमत अभिव्यक्ती- (४)

आनंद मिळविण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करता येणे शक्य आहे असे लेखकास वाटले?

वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं या विधानाविषयी तुमचे मत स्पष्ट करा.

किंवा

शिवराज गोर्ले ‘आयुष्य-आनंदाचा उत्सव’ या पाठात त्यांनी आनंद हा प्रत्येक अंतरंगात असून तो मिळविण्यासाठी त्याच्यामध्ये आनंदांचे भान जागे असावे लागते. हा विचार व्यक्त केला आहे.

[1.03] आयुष्य... आनंदाचा उत्सव
Chapter: [1.03] आयुष्य... आनंदाचा उत्सव
Concept: undefined >> undefined

पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(१) दिलेल्‍था उताऱ्याच्या आधारे आकृतिबंध पूर्ण करा. (2)

(i) 

(ii)

  1. आईचं नातं
  2. इतर नाती

अशी अनेक चित्रं काढता काढता एका क्षणी माझ्या लक्षात आलं, की व्यंगचित्रं ही नि:शब्द भाषा आहे. त्या रेषांना शब्द नाहीत; पण तरीही ती एक प्रभावी भाषा आहे. मला वाटतं तशी ती खरंच भाषेइतकी संवादी आहे का हे अजमावण्यासाठी म्हटलं, घेऊ अनुभव! माझे हे खेळ सुरू झाले. एखादी सुंदर काव्यात्म कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? तर उत्तर आलं ‘येते’. हे मी स्वत: अनुभवलं. व्यंगचित्रातून एखाद्या माणसाबद्दलची भावना व्यक्त करता येते का? तर तीही येते. शब्दांतूनसुद्धा ती व्यक्त होणार नाही इतकी छान करता येते. व्यंगचित्राच्या भाषेला जी मार्मिकता आहे ती शब्दाहून प्रभावी आहे. अशी जी काव्यात्म चित्रं मी रेखाटली त्यातलं एक ‘आई’ विषयी सारं काही सांगण्यासाठीच होतं. आईचं नातं हे सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. बाकीची नाती ही जोडलेली असतात. माणसांमध्ये मला जर कुठे ईश्वराचा अंश दिसत असेल तर तो आईमध्ये दिसतो. हे नातं मला कसं दिसतं हे व्यक्त करण्यासाठी मी जे चित्र काढलेलं होतं, त्यात उन्हाळ्यातला वैशाख वणवा आहे. त्यात एक सुकलेलं झाडपण आहे. एकही पान नसलेल्या त्या झाडाच्या फांदीवर एका पक्ष्यानं घरटं केलेलं आहे. त्या घरट्यात चोच उघडून आकाशाकडे बघणारी तीन चार पिल्लं आहेत आणि त्या पिल्लाची कणसदृश्य आई पार आकाशात गेलीय. दूरवर सापडलेला एक पावसाचा ढग ती चोचीनं घरट्याच्या दिशेनं ओढून आणतेय. आता आई हे नातं मी कितीही शब्द वापरले तरी या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही. हे व्यक्त झालं असेल तर हा मोठेपणा माझा नाही. ही या माध्यमाची ताकद आहे. मी या चित्राखाली काही लिहीत नाही. हे चित्र आवडल्याचं सांगत अनेक लोक माझ्याकडे येतात. ते का आवडलं हे त्यांना सांगता येत नाही; पण त्यातला आशय त्यांच्यापर्यंत पोहोचताे म्हणूनच ते त्यांना आवडलेलं असतं.

व्यक्त होण्याची गोष्ट खूप पुढे नेत नेत मी माझ्या वडिलांना माझ्या व्यंगचित्रांमधून खूप मनापासून श्रद्धांजली वाहिली. या चित्रांमधल्या पहिल्या चित्रात मी भर पावसात उभा आहे आणि माझ्या डोक्यावर दोन अक्षरं आहेत ‘बाबा’. पाऊस ‘बाबा’ या शब्दाच्या दोन्ही बाजूंनी पडतो आहे. खाली इवलासा मी सुरक्षित आहे. मी त्यात माझं लहानपण दाखवलंय. दुसऱ्या चित्रात आता ते शब्द नाही येत; पण तरीदेखील तो पाऊस माझ्या दोन्ही बाजूंनी जातो आहे. मी तिथे उभा आहे तो आत्ताच्या वयाचा पंचाहत्तरी पूर्ण केलेला आहे. बाबांनी जे काही माझ्यासाठी निर्माण करून ठेवलं आहे ते त्यांच्यामागे आत्तापर्यंत मला खूप मोठा आधार, खूप मोठा आश्रय देत आलं आहे. माझ्या व्यंगचित्रातून मी हेही व्यक्त करू शकलो.

(२) व्यंग हे भाषेपेक्षा संवादाचे माध्यम आहे या विधानाचा अर्थ स्पष्ट करा. (2)

(३) स्वमत अभिव्यक्ती- (4)

लेखकाने व्यंगचित्रातून  वडिलांना कशाप्रकारे श्रद्धांजली वाहिली? हे स्पष्ट करा.

किंवा

व्यंगचित्राकार म्हणून ‘आई’ विषयी मांडलेली काव्यात्म कल्पना तुमच्या भाषेत लिहा.

[2.12] रंगरेषा व्यंगरेषा
Chapter: [2.12] रंगरेषा व्यंगरेषा
Concept: undefined >> undefined

Advertisements

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी;
हें कशाचें दु:ख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!

सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा:
‘‘चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा!’’

माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी:
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!

(१) (2)

(i)

(ii)

  1. कवीची सदैव सोबत करणारी
  2. कवीची विश्वासघात करणारे

(२) (2)

कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!”

या ओळींचा अर्थ लिहा.

(३) अभिव्यक्ती: (4)

‘समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात’ सोदाहरण स्पष्ट करा.

[1.06] रंग माझा वेगळा (कविता)
Chapter: [1.06] रंग माझा वेगळा (कविता)
Concept: undefined >> undefined

मनुष्य इंगळी अति दारुण।
मज नांगा मारिला तिनें।
सर्वांगी वेदना जाण।
त्या इंगळीची।

या ओळीतील काव्यसौंदर्य स्पष्ट करा.

[2.07] विंचू चावला... (भारूड)
Chapter: [2.07] विंचू चावला... (भारूड)
Concept: undefined >> undefined

अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी

या ओळीचे रसग्रहण करा.

[2.11] आरशातली स्त्री (कविता)
Chapter: [2.11] आरशातली स्त्री (कविता)
Concept: undefined >> undefined

‘वृत्तलेखन करत असताना वाचकांची अभिरुची लक्षात घ्यावी लागते’ तुमचे मत लिहा.

[4.04] वृत्तलेख (फिचर रायटिंग)
Chapter: [4.04] वृत्तलेख (फिचर रायटिंग)
Concept: undefined >> undefined

‘हुरडा पार्टी’साठी माहितीपत्रक तयार करा.

[4.02] माहितीपत्रक
Chapter: [4.02] माहितीपत्रक
Concept: undefined >> undefined

व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखाचा नमुना तयार करा.

[4.04] वृत्तलेख (फिचर रायटिंग)
Chapter: [4.04] वृत्तलेख (फिचर रायटिंग)
Concept: undefined >> undefined

खालील विषयांवर निबंधलेखन करा.

कल्पनाप्रधान निबंध

पेट्रोल संपले तर

[5.02] लेखन : निबंधलेखन
Chapter: [5.02] लेखन : निबंधलेखन
Concept: undefined >> undefined

खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वैचारिक निबंध

वाचते होऊया.

[5.02] लेखन : निबंधलेखन
Chapter: [5.02] लेखन : निबंधलेखन
Concept: undefined >> undefined

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(१) लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गंमती -        (२)

(य) ______

(र) ______

(२) (य) आनंदाविषयी उताऱ्यात आलेली काव्यपंक्ती -                (१)

(र) प्रस्तुत काव्यपंक्तीविषयी लेखकाने व्यक्त केलेले मत -          (१)

            आनंद सगळ्यांनाच हवा असतो... पण आपला आनंद नेमका कशात आहे, हे अनेकांना कळत नसतं. आनंद म्हणजे नेमकं काय हेही उलगडलेलं नसतं. कुठे असतो हा आनंद? कुठे नसतो हा आनंद? आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे! ही फक्त कविकल्पनाच नव्हे, तेच सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे!

            आनंदाची गंमत अशी आहे, की तुम्ही शोधू लागलात, की तो दडून बसतो, पकडू गेलात, की हातातून निसटतो. आनंदासाठी जितका आटापिटा कराल, तितका तो हुलकावण्या देतो. जितका सहजपणे घ्याल, तितका आनंद सहज प्राप्त होतो. आनंद असतोच. तो अनुभवता मात्र यावा लागतो.

            आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो. आनंद आपण बाहेर शोधत असतो आणि तो मात्र आत असतो. आनंद आपल्या मनातच असतो. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो.

            हे खरं आहे, की आनंद सर्वत्र असतो; पण अंतरंगात आनंद असेल, तरच तो अनुभवता येतो. आनंदाचं नातं जुळतं, ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षित करतो, तो फक्त आनंदच.

(३) स्वमत अभिव्यक्ती -          (४)

‘आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

किंवा

‘आनंदाची तुमची संकल्पना’ तुमच्या शब्दांत लिहा.

[1.03] आयुष्य... आनंदाचा उत्सव
Chapter: [1.03] आयुष्य... आनंदाचा उत्सव
Concept: undefined >> undefined

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(१) लेखकाने शक्तिप्रदर्शन करताना दिलेल्या धमक्या - (२)

(य) ______

(र) ______

(२) दंतवैद्याने केलेल्या दोन क्रिया - (२)

(य) ______

(र) ______

           दंतवैद्य अलीकडे फारच माणसाळलेले आहेत असे माझे प्रामाणिक मत झाले. त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन देऊन इतका लीलया दात उपटला, की मी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलो! दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते. मी आजवर शत्रूंना आणि शेजाऱ्यांना भांडणाच्या वेळी ‘दात उपटून हातात ठेवीन’, ‘दात घशात घालीन’ अशा माझ्या शक्तीचे प्रदर्शन करणाऱ्या धमक्या दिल्या होत्या. त्यांना काहीच अर्थ नव्हता, याची हळहळ दंतवैद्याच्या खुर्चीत असतानाच वाटली.

           दंतवैद्याने दात दाखवला. हाच तो खलदंत! ज्याने माझे बायकोपुढे हसे केले तोच हा नीच दात. नतद्रष्ट! ‘तुला हेच शासन योग्य आहे’ असे मी उरलेले दातओठ खाऊन मनाशी म्हणालो. आता पुन्हा तो ठणका लागणार नाही, पुन्हा ते बोळे धरावे लागणार नाहीत. पुन्हा बायकोचा उपदेश ऐकावा लागणार नाही. ह्या विचारांनी मी आनंदाने बेहोश झालो. उरलेल्या दातांना धाक बसावा म्हणून तो काढलेला दात घरी नेण्याचा विचार मनात येऊन गेला; पण त्या दाताची संगतसुद्धा नको असे वाटून मी तो दंतवैद्यालाच अर्पण केला. आनंदाने घरी आलो. दारातूनच ओरडून चार-पाच शेजाऱ्यांना सांगितले, की ‘‘तो तुम्हांला जागवणारा दात गेला. यापुढे दंतसप्ताह नाही.’’

(३) स्वमत अभिव्यक्ती - (४)

‘यापुढे दंतसप्ताह नाही,’ लेखकाच्या या विधानाची कारणमीमांसा तुमच्या शब्दांत लिहा.

किंवा

दातदुखीच्या कथा-व्यथा सोदाहरण लिहा.

[2.1] दंतकथा
Chapter: [2.1] दंतकथा
Concept: undefined >> undefined

खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(१) कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे - (२)

(य) ______

(र) ______

(२) खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा - (२)

(य) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते. (१)

(र) स्वतःचा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते. (१)

सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

फुलं सोन्याची, झेंडू तोडते
बाई तोडते
नाही फुलं ग, देह तोडते
बाई तोडते
घरादाराला, तोरण बांधते
बाई बांधते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

ऊस लावते, बेणं दाबते
बाई दाबते
नाही बेणं ग, मन दाबते
बाई दाबते
कांड्या-कांड्यांनी, संसार सांधते
बाई सांधते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

उन्हातान्हात, रोज मरते
बाई मरते
हिरवी होऊन, मागं उरते
बाई उरते
खोल विहिरीचं, पाणी शेंदते
बाई शेंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

(३) अभिव्यक्ती - (४)

कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता कष्टकरी शेतकरी स्त्रीचे योगदान स्पष्ट करा.

[1.02] रोज मातीत (कविता)
Chapter: [1.02] रोज मातीत (कविता)
Concept: undefined >> undefined

खालील ओळींचा अर्थ लिहा.

ह्या विंचवाला उतारा।
तमोगुण मागें सारा।
सत्त्वगुण लावा अंगारा।
विंचू इंगळी उतरे झरझरां।।

सत्त्व उतारा देऊन।
अवघा सारिला तमोगुण।
किंचित् राहिली फुणफुण।
शांत केली जनार्दनें ।।

[2.07] विंचू चावला... (भारूड)
Chapter: [2.07] विंचू चावला... (भारूड)
Concept: undefined >> undefined
कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!
सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा :
‘‘चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा!’’
माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!

वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

[1.06] रंग माझा वेगळा (कविता)
Chapter: [1.06] रंग माझा वेगळा (कविता)
Concept: undefined >> undefined
समुद्र अस्वस्थ होऊन जातो
शहराच्या आयुष्याच्या विचाराने.
तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरूं लागतो
शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून.
उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो
स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत.

वरील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.

[2.09] समुद्र कोंडून पडलाय (कविता)
Chapter: [2.09] समुद्र कोंडून पडलाय (कविता)
Concept: undefined >> undefined

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(१) एका वाक्यात उत्तरे लिहा. (२)

(य) कथा उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचण्यामागील कारण लिहा. (१)

(र) कथेतील भाषायोजनेचे घटक लिहा. (१)

          कथेत चांगल्या-वाईटाचा संघर्ष असतो. त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातूनच कथा उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचते. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर आनंद आणि सुखात्मिक घटनांतूनही नाट्यमयता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्षबिंदू नाट्यपूर्णरीतीने साधता येतो; पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो.

          कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. पात्रांच्या स्वभावधर्मानुसार व परिस्थितिजन्य घटकांनुसार संवाद लिहिले जातात. या संवादात लय व आंतरिक संगती महत्त्वाची असते. संवादातून रसनिर्मिती आणि रसपरिपोष होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात.

          कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यांनुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. कथाकार, त्याचा दृष्टिकोन, त्याची अनुभव घेण्याची पद्धत यांनुसार कथेचे भाषारूप आणि शैलीविशेष निश्चित होत जातात. कथा लिहिताना साधारणत: प्रमाण भाषा आणि बोली भाषा यांची सरमिसळ केली जाते. तसेच कथा पूर्णपणे बोलीभाषेतही लिहिली जाते.

(२) कथेतील संवादाची वैशिष्ट्ये लिहा. (२)

[3] कथा-साहित्यप्रकार-परिचय
Chapter: [3] कथा-साहित्यप्रकार-परिचय
Concept: undefined >> undefined

बापू गुरुजींनी गावातील शाळेसाठी केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.

[3.02] गढी
Chapter: [3.02] गढी
Concept: undefined >> undefined

अनु व सुनीता यांच्यात निर्माण झालेला भावनिक बंध लिहा.

[3.01] शोध
Chapter: [3.01] शोध
Concept: undefined >> undefined

माहितीपत्रकाचे महत्त्व स्पष्ट करा.

[4.02] माहितीपत्रक
Chapter: [4.02] माहितीपत्रक
Concept: undefined >> undefined
< prev  101 to 120 of 192  next > 
Advertisements
Advertisements
Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Question Bank Solutions
Question Bank Solutions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Economics [अर्थशास्त्र]
Question Bank Solutions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा English
Question Bank Solutions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Geography [भूगोल]
Question Bank Solutions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Hindi
Question Bank Solutions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा History [इतिहास]
Question Bank Solutions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Information Technology
Question Bank Solutions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Marathi
Question Bank Solutions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Mathematics and Statistics
Question Bank Solutions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Political Science [राज्यशास्त्र]
Question Bank Solutions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Psychology [मानसशास्त्र]
Question Bank Solutions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) १२ वीं कक्षा Sociology [समाजशास्त्र]
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×