Advertisements
Advertisements
पुढील कवितेच्या खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. गुण (०८)
|
झाड बसते ध्यानस्थ ऋषिसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत... पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग रक्त होते क्षणभर हिरवेगार आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत झाडाचे बाहु सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणे दडलेले असते हसावं कसं सळसळत्या पानासारखं मुळावं मुरावं कसं तर? झाडासारखं घट्ट पाय रोवीत जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं! |
मुद्दे:
१. प्रस्तुत कवितेचे कवी/ कवयित्री- (०१)
२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)
३. कवितेतील दिलेल्या ओळीचा सरळ अर्थ लिहा. (०२)
'हसावं कसं सळसळत्या पानासारखं'
४. कवितेत आलेल्या शब्दांचे अर्थ लिहा. (०२)
- शरीर-
- वस्त्र-
- अलगद-
- मंजुळ-
५. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण- (०२)
६. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश - (०२)
Concept: undefined >> undefined
पद्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०८)
आकलन कृती
१. जोड्या जुळवा. (०२)
| क्र. | 'अ' | 'ब' |
| १. | सुदर्शन चक्र | शुभंकर |
| २. | मंत्र | शक्ती |
| ३. | नौबत | चैतन्य |
| ४. | हस्त | श्रमशक्ती |
|
या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।। फुलामुलांतून हसतो श्रावण मातीचे हो मंगल तनमन चैतन्याचे फिरे सुदर्शन शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।। या हातांनी यंत्र डोलते श्रमशक्तीचे मंत्र बोलते उद्योगाचे चक्र चालते आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार।। हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट शक्तीचीही झडते नौबत घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।। या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा हस्त शुभंकर हवा एकदा भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।। |
२. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)
१. कोणाचे स्वप्न साकार करायचे आहे?
२. शेतातील धान्याला कशाची उपमा दिली आहे?
३. कवितेत आलेल्या खालील शब्दांचा अर्थ लिहा. (०२)
१. मंगल -
२. तन -
३. ललकार -
४. विभव -
४. खालील पंक्तींमधून सूचित होणारा अर्थ लिहा. (०२)
या विश्वाची विभव संपदा
जपू वाढवू आम्ही लाखदा
भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।।
Concept: undefined >> undefined
Advertisements
कवितेसंबंधी खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. गुण (०८)
|
या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।। फुलामुलांतून हसतो श्रावण मातीचे हो मंगल तनमन चैतन्याचे फिरे सुदर्शन शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।। या हातांनी यंत्र डोलते श्रमशक्तीचे मंत्र बोलते उद्योगाचे चक्र चालते आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार।। हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट शक्तीचीही झडते नौबत घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।। या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा हस्त शुभंकर हवा एकदा भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।। |
१. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री- (०१)
२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)
३. दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. (०२)
या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार
नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।
४. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश- (०२)
५. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे- (०२)
६. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचा अर्थ लिहा. (०२)
१. चैतन्य
२. श्रम
३. उद्योग
४. उत्क्रांती
Concept: undefined >> undefined
तुम्हाला समजलेली ‘जाता अस्ताला’ या कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.
Concept: undefined >> undefined
सूर्य ऊर्जेचा स्रोत या विषयावर जाता अस्ताला या कवितेच्या आधारे लिहा.
Concept: undefined >> undefined
कवीने जाता अस्ताला मधील पणतीच्या प्रतीकातून काय सूचित केले आहे.
Concept: undefined >> undefined
प्रकाशाचे कोणतेही रूप आनंददायक हे विधान जाता अस्ताला या कवितेच्या आधारे स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
व्युत्पत्ती कोश या पाठाच्या आधारे शब्दांचे विविध अर्थ व समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ याविषयी सविस्तर लिहा.
Concept: undefined >> undefined
व्युत्पत्ती कोश आजच्या युगात किती आवश्यक आहे ते उदाहरणे देऊन सांगा.
Concept: undefined >> undefined
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
| आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये 'मालती निवासातील' पहिल्या माळयावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला; पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने 'शाळेत कसा जाऊ?' असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं! पण माझ्या आईनं धीर सोडला नाही. ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती; पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. |
1. का ते लिहा. (2)
- डॉ. माशेलकर यांना माशेल हे गाव सोडावे लागले, कारण ______
- 'शाळेत कसा जाऊ? ' असा प्रश्न डॉ. माशेलकर यांच्यापुढे उभा राहिला, कारण ______
2. आकृती पूर्ण करा. (2)

3. स्वमत: (3)
शालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील डॉ. माशेलकर यांचे तुम्हांला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण लिहा.
Concept: undefined >> undefined
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
| संयमाला तुच्छ मानू नका. तुमच्या विकासासाठी तो आहे. समाजाच्या हितासाठी तो आहे. आपण संयम पाळला नाही, तर आपले काम नीट होणार नाही. काम नीट झाले नाही म्हणजे समाजाचे नुकसान होणार. आपण केवळ आपल्या स्वत:साठी नाही. आपण समाजासाठी आहोत, याची जाणीव आपणांस हवी. हा आपला देह, हे आपले जीवन समाजाचे आहे. आपले पोषण सारी सृष्टी करीत आहे. सूर्य प्रकाश देत आहे, मेघ पाणी देत आहेत, वृक्ष फुले-फळे देत आहेत, शेतकरी धान्य देत आहे, विणकर वस्त्र देत आहे. आपण या सर्व सजीव-निर्जीव सृष्टीचे आभारी आहोत. यासाठी हे आपले जीवन त्यांच्या सेवेत अर्पण करणे हे आपले काम आहे. |
1. योग्य जोड्या लावा. (2)
| 'अ' गट | 'ब' गट | |
| i. | सूर्य | पाणी |
| ii. | मेघ | वस्त्र |
| iii. | शेतकरी | प्रकाश |
| iv. | विणकर | धान्य |
2. एका शब्दात उत्तरे लिहा. (2)
- आपल्या विकासासाठी आवश्यक असलेला - ______
- आपले पोषण करणारी - ______
Concept: undefined >> undefined
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
| झाड बसते ध्यानस्थ ऋषिसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत... पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग रक्त होते क्षणभर हिरवेगार आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत झाडाचे बाहु सरसावलेले असतात मुसाफिराना कवेत घेण्यासाठी पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणे दडलेले असते हसावं कसं सळसळत्या पानासारखं मुळावं मुरावं कसं तर? झाडासारखं घट्ट पाय रोवीत जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं! |
1. चौकटी पूर्ण करा. (2)
- मुळावर घाव घातले; तरी मुकाट सहन करणारे - ______
- अलगद उतरणारे थेंब - ______
2. आकृती पूर्ण करा. (2)

3. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)
- मुकाट -
- मुसाफिर -
- संथ -
- मौन व्रत -
4. काव्यसाैंदर्य: (2)
'जगावं कसं तर? हिरव्या झाडासारखं' या ओळीतील अर्थसाैंदर्य स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
खालील दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
| मुददे | 'अंकिला मी दास तुझा' किंवा 'स्वप्न करू साकार' | |
| 1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | ||
| 2. प्रस्तुत कवितेचा विषय | ||
| 3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. | 'अग्निमाजि पडे बाळू । माता धांवें कनवाळू।।' | 'हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट।।' |
| 4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | ||
| 5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. | i. काज - ii. सवें - iii. पाडस - iv. धेनू - |
i. विभव - ii. मंगल - iii. श्रम - iv. हस्त - |
किंवा
| मुददे | 'स्वप्न करू साकार' |
| 1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
| 2. प्रस्तुत कवितेचा विषय | |
| 3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. | 'हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट।।' |
| 4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
| 5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. | i. विभव - ii. मंगल - iii. श्रम - iv. हस्त - |
Concept: undefined >> undefined
भाषिक घटकांवर आधारित कृती.
1. शब्दसंपत्ती:
i. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. (01)
- पाऊस =
- मधुर =
ii. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. (01)
- सुरुवात ×
- स्तुती ×
iii. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. (01)
- पायात चप्पल न घालत - ______
iv. वचन बदला. (01)
- गोष्ट
- कल्पना
2. खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा. (02)
- कवीवर्य नारायण सुर्वे खुप सभा, संमेलने गाजवत.
- तीने माझ्यासाठी प्रंचड कष्ट केले.
3. खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा. (02)
- अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे.
- “काका हे शास्त्रीय सत्य आहे'’.
Concept: undefined >> undefined
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.
| मुद्दे | 'स्वप्न करू साकार' |
| 1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
| 2. प्रस्तुत कवितेचा विषय | |
| 3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. | 'हजार आम्ही एकी बळकट। सर्वांचे हो एकच मनगट।।' |
| 4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
| 5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. | i. विभव - ii. मंगल - iii. श्रम - iv. हस्त - |
Concept: undefined >> undefined
पुढील मुद्द्यांवर एक परिच्छेद तयार करा.
| व्युत्पत्ती कोश | ||
| निर्मितीचा ठराव | निर्मितीची जबाबदारी | निर्मितीसाठी अर्थसाहाय्य |
Concept: undefined >> undefined
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) कोण, ते लिहा: (2)
- निरंजनचा सर्व खर्च करणारे -
- निरंजनला मावशीकडे सोडून पुन्हा न परतलेला -
| मामा गेला तो पुन्हा परतला नाही मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा. घरातल्या सर्वांशी त्याने जमवून घेतलं आणि शाळेत नाव दाखल केलं. मावशीची परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भडसावळे गुरुजींनी त्याला थोरामोठ्यांच्या घरी वार लावून दिले. दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा, मग तिथून शाळेत. संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर राहायचा. सकाळी लवकर उठून घरातली, गोठ्यातली सारी कामं आटपून अभ्यासाला बसायचा. गुरुजींवर श्रद्धा ठेवायचा आणि परीक्षेत पहिला नंबर पटकवायचा. त्याच्या वह्या-पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजीच करायचे. गुरुजींनी त्याला सांगितलं, की ‘जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे, तोपर्यंतच मी सारा खर्च करीन आणि वारही लावून देईन. नाहीतर नाही.’ गुरुजींचं हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा. आज नागरिकशास्त्राचा अभ्यास करत असताना आधीचे सगळे पेपर्स चांगले गेले असल्याने तो मनोमन खूश होता. |
(2) का ते लिहा: (2)
- निरंजन वार लावून जेवायचा, कारण ______
- निरंजन झटून अभ्यास करायचा, कारण ______
(3) तुम्हांला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्ये लिहा. (3)
Concept: undefined >> undefined
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) आकृतिबंध पूर्ण करा: (2)

| अडचणींनी आणि रोगांनी भांबावून जाण्याचे काय कारण आहे? संकटे ही काही कायमची नसतात ना? मग त्यांच्याकडे सोशिकपणे, खिलाडू वृत्तीने पाहण्याची दृष्टी का असू नये? संकटांचे जेव्हा आपल्यावर आक्रमण होते, तेव्हा ती फार मोठी किंवा असह्य वाटतात; परंतु ती ओसरल्यावर, आपण त्यांना का घाबरलो तेच आपल्याला समजत नाही. आपण घाबरतो याचे कारण आपल्याजवळ मनाची स्थिरता किंवा शांती नसते. मनाची शांती नसते याचे कारण अडचणींचे खरेखुरे स्वरूप आपणांस कळलेले नसते. जीवन म्हणजे संकटे नव्हेत, कारण ती असतानाही जीवन चालूच असते. मळभ आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही, त्याचप्रमाणे रोगांनी नि संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही. आजारी व संकटग्रस्त माणसेही जेव्हा थट्टा-विनोद करतात, तेव्हा ती या आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात. |
(2) कधी ते लिहा: (2)
- आपण संकटांना का घाबरलो तेच आपल्याला समजत नाही.
- आजारी, संकटग्रस्त माणसे आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात.
Concept: undefined >> undefined
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) योग्य पर्याय निवडा. (2)
(1) सैनिकाचे औक्षण केले जाते ______.
(i) भरलेल्या अंतःकरणाने
(ii) डोळ्यांतील आसवांच्या ज्योतींनी
(iii) तबकातील निरांजनाने
(iv) भाकरीच्या तुकड्याने
(2) कवितेतील ‘दीनदुबळे’ म्हणजे ______.
(i) कष्टाचे, पैशाचे सामर्थ्य नसलेले
(ii) सैनिकाबरोबर लढणारे
(iii) शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेले
(iv) सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय
|
नाही मुठीमध्ये द्रव्य जीव ओवाळावा तरी वर घोंघावे बंबारा, तुझी विजयाची दौड अशा असंख्य ज्योतींची |
(2) कृती करा: (2)
- डोळे भरून पाहावे असे दृश्य -
- अपुरे वाटणारे सामर्थ्य -
(3) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा: (2)
- औक्षण -
- द्रव्य -
- शौर्य -
- आसवे -
(4) काव्यसौंदर्य: (2)
‘अशा असंख्य ज्योतींची
तुझ्यामागून राखण’
या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
