हिंदी

उत्ताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून येई. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

उत्ताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) आकृती पूर्ण करा: 2

सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून येई. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळंच जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरीपण आपले वाटणारे. ओळखीचे धागे जुळणारे. न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या! म्हणजे, जग असंही असतं तर...! मला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती. लिहिलेली होती.

जे सुचलं, जे लिहावसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं! मला भाषेची ताकद समजत होती. लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती, म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेड लावायचा की बस्स!

आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्यांचं. आमच्या घरामागे एक मोठ उंबराचं झाड होतं. उन्हं तापण्याचे दिवस आले, की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशातरीच पानांचं, गाठीगाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उंबरांनी आणि राथूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं! मी वाट पाहायचे त्या थव्यांची. त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची.

(2) कोठे ते लिहा: 2

  1. लेखिकेची पुस्तकांच्या गराड्यात बसण्याची जागा -
  2. पोपटांचे थवे उतरायचे ठिकाण - 

(3) स्वमत: 

पुस्तकांची वाट पाहण्याचा लेखिकेचा अनुभव तुमच्या शब्दांत लिहा. 3

आकलन
Advertisements

उत्तर

(1)

(2)

  1. लेखिकेची पुस्तकांच्या गराड्यात बसण्याची जागा - माळ्यावर
  2. पोपटांचे थवे उतरायचे ठिकाण - उंबराचे झाड

(3)

‘वाट पाहताना’ या पाठात लेखिकेने जीवनातील एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी संयमाने प्रतीक्षा करणे आवश्यक आहे, असा तिचा आग्रह आहे. वाट पाहणे सहसा आनंददायी नसते, परंतु त्यातून जीवनाचा खरा अर्थ समजतो.

जर एखादी गोष्ट लगेच मिळाली, तर तिचे खरे मूल्य कळत नाही. इच्छा त्वरित पूर्ण झाली तर आनंद होतो, पण त्यामुळे आपण वरवरच्या गोष्टींमध्ये गुंतून राहू शकतो. मात्र प्रतीक्षा केल्यामुळे आपली खरी आवड आणि गरज काय आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे मोलाच्या गोष्टी ओळखण्याची दृष्टी विकसित होते. अशा मोलाच्या गोष्टी मिळाल्या की जीवन अधिक अर्थपूर्ण आणि समृद्ध बनते. त्यामुळे वाट पाहणे जरी कठीण असले, तरी ते जीवनासाठी उपयुक्त ठरते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×