हिंदी

मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा.

नियम
Advertisements

उत्तर

प्रस्‍तावना: सन १८९० मध्ये प्रकाशित झालेल्‍या ‘अर्थशास्‍त्राची मूलतत्‍त्‍वे’ या ग्रंथात प्रा.आल्‍फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या नियमाची मांडणी केली आहे. या नियमाद्‌वारे किंमत व मागणी यातील परस्‍पर संबंध स्‍पष्‍ट केला आहे.

सिद्धांताचे विधान: प्रा. आल्‍फ्रेड मार्शल यांच्या मते, ‘‘इतर परिस्‍थिती स्‍थिर असताना वस्‍तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्‍तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते.’’

दुसऱ्या शब्‍दांत, इतर परिस्‍थिती कायम असताना, वस्‍तूच्या किमतीत वाढ होते तेव्हा वस्‍तूच्या मागणीत घट होते आणि जेव्हा वस्‍तूच्या किंमतीत घट होते तेव्हा वस्‍तूच्या मागणीत वाढ होते. अशा प्रकारे किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्‍त स्‍वरूपाचा म्‍हणजेच परस्‍परविरोधी असतो.

मागणी व किंमत यांचा फलनसंबंध खालील प्रकारे स्‍पष्‍ट करता येतो.

मागणीच्या नियमाचे अपवाद:

मागणीच्या नियमाचे काही अपवाद आहेत. याचाच अर्थ काही अपवादात्‍मक परिस्‍थितीत वस्‍तूंची किंमत वाढते तेव्हा उपभोक्‍ता अधिक वस्‍तूंची खरेदी करतो आणि किंमत कमी झाल्‍यावर कमी वस्‍तूंची खरेदी करतो. अशा वेळी मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा असतो. मागणी वक्रातील धनात्‍मक संबंध आकृतीच्या साहाय्याने स्‍पष्‍ट केला आहे.

मागणीच्या नियमाचे अपवाद खालीलप्रमाणे आहेत:

  1. गिफेनचा विरोधाभास: कनिष्‍ठ वस्‍तू किंवा हलक्‍या प्रतीच्या वस्‍तू म्‍हणजे गिफेन वस्‍तू, की ज्‍या वस्‍तूंच्या किमती कमी झाल्‍या तरी त्‍यांच्या मागणीत वाढ होत नाही. अशा वेळी जेव्हा वस्‍तूची किंमत कमी होते, तेव्हा त्‍या वस्‍तूची मागणी कमी होते. सर रॉबर्ट गिफेन यांनी इंग्‍लंडमध्ये कनिष्‍ठ दर्जाच्या वस्‍तूंमधील संबंध शोधून काढला, जेव्हा पावाच्या किंमती कमी होतात तेव्हा व्यक्‍ती त्‍यांची अधिक खरेदी करत नाहीत. कारण त्‍याची खरेदीशक्‍ती आणि वास्‍तव उत्‍पन्नात वाढ होते आणि त्‍याऐवजी ते उच्च दर्जाच्या वस्‍तू. उदा., मांस खरेदी करण्यास प्राधान्य देतात, यालाच गिफेनचा विरोधाभास असे म्‍हणतात.
  2. प्रतिष्‍ठेच्या वस्‍तू: मौल्‍यवान वस्‍तू जसे, हिरे, सोने इत्‍यादी प्रतिष्‍ठा दर्शक वस्‍तू आहेत. म्‍हणून श्रीमंत व्यक्‍ती अशा वस्‍तूंच्या किमतीत वाढ झाली तरीही अधिक वस्‍तू खरेदी करतात.
  3. भविष्‍यकालीन किमतीचा अंदाज: जेव्हा लोकांना भविष्‍यकाळात वस्‍तूंच्या किंमती वाढतील असा अंदाज असेल, तेव्हा हा मागणीचा नियम खरा ठरणार नाही. अशा परिस्‍थितीत, वस्‍तूंच्या किंमती वाढत असताना देखील उपभोक्‍ते अधिक मागणी करतात. उदा., दीपावलीच्या अगोदर साखर, तेल यांसारख्या वस्‍तूंच्या किंमती वाढत असतानाही उपभोक्‍ते वाढत्‍या किंमतीला मागणी करतात. कारण दीपावलीमध्ये किंमती अधिक वाढण्याची शक्‍यता असते.
  4. किमतीचा आभास: अनेक वेळा उपभोक्‍त्‍यांना असे वाटते की, जास्‍त किमतीच्या वस्‍तू चांगल्‍या दर्जाच्या असतात आणि म्‍हणून या वस्‍तूंच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. उदा., उच्च दर्जाच्या वस्‍तू.
  5. अज्ञान: काही वेळेस व्यक्‍ती अज्ञानामुळे अधिक किंमत असतानाही वस्‍तू खरेदी करतात. हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा उपभोक्‍त्‍याला इतर ठिकाणी त्‍या वस्‍तूंवरील किमतीबद्दल माहिती नसते.
  6. सवयीच्या वस्‍तू: चहासारख्या विशिष्‍ट वस्‍तूंच्या उपभोगाची सवय असल्‍यास अधिक किंमतीलाही गरजेनुसार खरेदी केली जाते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×