हिंदी

खालीलपैकी फरक स्पष्ट करा: समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालीलपैकी फरक स्पष्ट करा:

समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

आधार समहक्क भाग अग्रहक्क भाग
१. अर्थ जे समभाग प्राधान्य समभाग नाहीत त्यांना समहक्क भाग म्हणतात. या समभागांना लाभांश देणे व भांडवल परतफेडीबाबत प्राधान्य हक्क नसतो.

अग्रहक्क भागांना खालील बाबींमध्ये प्राधान्य हक्क असतो:

  1. लाभांश देयक
  2. भांडवलाची परतफेड
२. लाभांशाचा दर कंपनीच्या नफ्यावर अवलंबून लाभांश बदलत्या दराने दिला जातो. लाभांश निश्चित दराने दिला जातो.
३. मतदानाचा हक्क समहक्क भागांना नियमित मतदानाचा हक्क असतो. ते कंपनीच्या व्यवस्थापनात सहभागी होतात. अग्रहक्क भागधारकांना नियमित मतदानाचा हक्क नसतो. त्यांच्या हितसंबंधांशी संबंधित बाबींवरच ते मतदान करू शकतात.
४. भांडवलाचे स्वरूप समहक्क भाग भांडवल हे कायमस्वरूपी भांडवल असते. याला ‘जोखमीचे भांडवल’ (Risk Capital) म्हणतात. अग्रहक्क भागभांडवल हे ‘सुरक्षित भांडवल’ मानले जाते आणि त्यावर स्थिर परतावा मिळतो.
५. गुंतवणूकदाराचे स्वरूप जोखीम पत्करण्यास तयार असलेले गुंतवणूकदार समहक्क भागात गुंतवणूक करतात. त्वरित व निश्चित परतावा मिळवू इच्छिणारे गुंतवणूकदार अग्रहक्क समभागात गुंतवणूक करतात. तुलनेने कमी परतावा मिळतो.
६. दर्शनी किंमत इक्विटी समभागांची दर्शनी किंमत सामान्यतः ₹ १ किंवा ₹ १० असते. ती तुलनेने कमी असते. अग्रहक्क समभागांची दर्शनी किंमत तुलनेने जास्त असते, उदा. ₹ १०० इत्यादी.
७. प्रकार
  1. सामान्य मतदान हक्क असलेले इक्विटी समभाग
  2. भिन्न मतदान हक्क असलेले इक्विटी समभाग
  1. संचयी (Cumulative)
  2. असंचयी (Non-cumulative)
  3. रूपांतरित (Convertible)
  4. अरूपांतरित (Non-convertible)
  5. परतफेडयोग्य (Redeemable)
  6. अपरतफेडयोग्य (Irredeemable)
  7. सहभागी (Participating)
  8. असहभागी (Non-participating)
८. भांडवली मूल्यवृद्धी कंपनीची प्रगती होत गेल्यास समहक्क भागांची बाजारमूल्य वाढते, त्यामुळे भांडवली मूल्यवृद्धी होते. अग्रहक्क समभागांची बाजारमूल्य सहसा बदलत नाही, त्यामुळे भांडवली मूल्यवृद्धीची शक्यता नसते.
९. जोखीम लाभांशाचा दर बदलता असतो आणि भांडवल परतफेडीची हमी नसते, त्यामुळे जोखीम जास्त असते. निश्चित लाभांश दर व अग्रहक्क हक्कांमुळे जोखीम तुलनेने कमी असते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×