Advertisements
Advertisements
प्रश्न
'आश्विन' महिन्यातील निसर्गाचे निरीक्षण करा, त्याचा अनुभव घ्या व अनुभवलेखन करा.
लघु उत्तरीय
Advertisements
उत्तर
आषाढ, श्रावण, भाद्रपद हे पावसाचे महिने संपतात अन् आश्विन महिना उजाडतो. जीवजंतूंचे वाढलेले प्रमाण नष्ट करण्याचं आगळवेगळं सामर्थ्य आश्विनातील उन्हात असतं.
- जंतुनाशक अल्ट्राव्हायोलेट किरणांचं प्रमाण जरा जास्तच असतं. याचकरिता अंथरूणे पांघरूणे धुऊन या महिन्याच्या उन्हात वाळू घालायची पद्धत असावी.
- नित्यनवीन ऊर्जा देणारा हा आश्विन सरता सरता निरोप घेतानाही आपल्या जीवनात दिवेलागणकरून जातो.
- पुढील वर्षी येण्याचे वचन देऊन काळाच्या प्रवाहात गुप्त होताना अमावास्येलाही प्रकाशाच्या साठवणीची आठवण देतो.
- तेजस्वी उन्हाने वसुंधरेच्या हिरव्या वस्त्रांना आगळी वेगळी झळाळी देणारा, समृद्धीच्या वाटेवर जगन्मातेची उपासना करायला सांगणारा, अंधार दूर करून तेजाची आरती शिकवणारा, प्रकाशाचे वेड घेऊन जगणाऱ्यांच्या जीवनात आपोआप समृद्धी येते, असा संदेश देणारा आश्विन बारा महिन्यात वेगळा उठून दिसतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
